दिवाळी म्हणजे आनंदाचा उत्सव, दिव्यांचा सण आणि याच सणासुदीच्या काळात विविध पदार्थांची रेलचेल असते. अशात मिठाई, तेलात तळलेला फराळ, जंकफूड यासारख्या पदार्थांमुळे लोकांच्या खाण्याच्या सवयी बिघडतात. दिवाळीच्या काळात बाहेरील प्रदूषणाचे प्रमाणही वाढते. अशा परिस्थितीत रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होण्याची शक्यता असते. कमकुवत प्रतिकारशक्तीमुळे, एखादी व्यक्ती सहजपणे आजारी पडते.
सविस्तर वृत्तवाढत्या वयानुसार महिलांच्या शरीरात अनेक बदल दिसून येतात. 20 ते 25 वयात मुलीच्या चेहऱ्याचा रंग, गुणवत्ता पूर्णपणे बदलून जाते. या वयात शरीरात होणाऱ्या हार्मोनल बदलांमुळे त्वचेवर पिगमेंटेशन, काळे डाग, पिंपल्स येऊ लागतात. तसेच या वयात प्रामुख्याने जाणवणारी समस्या म्हणजे मेलाज्मा. वयाच्या 21 ते 25 वयात ही समस्या मोठ्या प्रमाणावर जाणवते. मेलाज्मामुळे त्वचेवर तपकिरी रंगाचे डाग दिसू लागतात.
सविस्तर वृत्तथंडीला आता पाहिजे तशी सुरूवात झालेली नाही. मात्र, थंडीला सुरूवात होताच जास्तीत जास्त लोक गरम पाण्याने आंघोळ करतात. कारण या दिवसात थंड पाण्यात कुणी हात घालायला देखील धजत नाहीत. लोक थंडी घालवण्यासाठी आणि शरीराला चांगलं वाटतं म्हणून बराच वेळ गरम पाण्याने आंघोळ करत बसतात.
सविस्तर वृत्तड्रायफ्रुट्समध्ये प्रामुख्याने सामविष्ट करण्यात येणारं अक्रोड शरीरासाठी अत्यंत फायदेशीर ठरतं. अक्रोडमध्ये अनेक आरोग्यदायी गुणधर्म आढळत असून शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठीही हे अत्यंत फायदेशीर ठरतं. अक्रोडला ब्रेन फूड असंही म्हणत असून मेंदूची शक्ती वाढविण्यासाठीही हे लाभदायक ठरतं.
सविस्तर वृत्तकिवी कसे खावे याबद्दल लोकांमध्ये अनेकदा गोंधळ असतो. बरेच लोक ते सोलून न काढता खातात तर काहीजण साल काढल्यानंतर खातात. जाणून घेऊया कोणती पद्धत योग्य आहे.
सविस्तर वृत्तआजच्या धकाधकीच्या जीवनात कधी-कधी बाहेर जाणे आणि फिरणे कठीण होऊन बसते. पण तुम्हाला माहीत आहे का की तुम्ही घराबाहेर न पडताही 10 हजार पावलं चालून सहज पूर्ण करू शकता? फक्त काही स्मार्ट पद्धतींचा अवलंब करा आणि घरात राहूनही तंदुरुस्त आणि सक्रिय रहा.
सविस्तर वृत्तसाखरेमुळे वजन वाढणं, लठ्ठपणा यांसारख्या समस्या उद्भवतात. जर साखरेचं अधिक प्रमाणात सेवन केलं तर तुम्हाला तब्येतीच्या गंभीर समस्या उद्भवू शकतात. (Fitness Tips) अनेकजण वजन कमी करण्यासाठी साखर पूर्णपणे सोडण्याचा विचार करतात पण काहीही केल्या त्यांची साखर सुटत नाही. साखरेचं सेवन कमी केल्यानंतर शरीरात काही बदल दिसून येतात. कोणते बदल दिसतात ते पाहूया.
सविस्तर वृत्तमाहिम येथील फोर्टिस सहयोगी एसएल रहेजा हॉस्पिटलमधील विभागप्रमुख (न्यूट्रिशन अँड डायटेटिक्स) कुमारी राजेश्वरी व्ही शेट्टी यांचा लेख
सविस्तर वृत्तचांगली पाचन क्रिया म्हणजे प्रकृती चांगली राहणं. पाचन क्रिया बिघडली, तर त्याचा परिणाम संपूर्ण आरोग्यावर होतो. प्रत्येकवेळी आंबट ढेकर, छातीत जळजळ होण्यामागे काय कारणं असू शकतात. प्रत्येकवेळी आंबट ढेकर, छातीत जळजळ होण्यामागे हे असू शकतं कारण
सविस्तर वृत्त"आरोग्याची वारी पंढरीच्या दारी - वर्ष २ रे" या उपक्रमात पंढरपूरच्या आषाढी वारीत या वर्षी १५ लाखांपेक्षा अधिक वारकऱ्यांची रुग्णसेवा यशस्वीरित्या पार पाडत, आरोग्य विभागाने आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांच्या पुढाकाराने वारकऱ्यांसाठी केलेल्या सेवेसाठी नवा इतिहास रचला आहे. पंढरपूरच्या महाआरोग्य शिबिराची नोंद ‘इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्डस’ने घेतली असून, हा विक्रम महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद आहे.
सविस्तर वृत्त