भाजप नेते आणि महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष शेखर चरेगांवकर यांना यशवंत सहकारी बँकेच्या 112 कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी अटक करण्यात आल्यानंतर त्यांना कराड न्यायालयातील पहिले अतिरिक्त सत्र न्यायाधीश यु. एल. जोशी यांनी दि. 2 मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती.
महाराष्ट्र राज्याचे मदत पुनर्वसन मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली,सर्व संबंधित अधिकाऱ्यांसह व श्रमिक मुक्ती दलाच्या शिष्टमंडळासह दिनांक ५ मार्च रोजी मंत्रालयात बैठक लावल्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेले चार दिवस सुरू असलेले बेमुदत ठिय्या आंदोलन तात्पुरते स्थगित केल्याचे श्रमिक मुक्ती दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांनी जाहीर केले.
साताऱ्यातील प्रभाग क्र. 16 मधील मुस्लिम लोकवस्तीच्या भागात पवित्र रमजान महिन्यात पाणीपुरवठा कमी वेळ होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
सातारा नगरपालिकेतील प्रशासन काळात झालेल्या कामकाजाची चौकशी करणे व पुणे मुंबई महानगरपालिका क्षेत्राप्रमाणे सातारा नगरपरिषद क्षेत्रातील 600 चौरस फूट मिळकतींना शून्य कर आकारणी करणे
भाजप नेते आणि महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष शेखर चरेगांवकर यांना यशवंत सहकारी बँकेच्या 112 कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.
न्यायालयाने सुनावली दोन मार्चपर्यंत पोलीस कोठडीसविस्तर वृत्त थोड्यावेळातच...
पाचगणी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एका गावातील अल्पवयीन 15 वर्षीय मुलीवर घरात घुसून जबरदस्तीने अत्याचार करीत व्हिडीओ, फोटो काढून प्रसारीत करण्याची धमकी दिल्याप्रकरणी 29 वर्षीय युवकाला बाललैगिंक अत्याचार प्रतिबंधक कायदा(पोक्सो)अंतर्गत व आयटी कायदया अंतर्गत वाई येथील अतिरिक्त जिल्हा सञ न्यायाधीश आर.एन.मेहरे यांनी दोषी धरत 20 वर्ष सश्रम कारावास व 15 हजार रुपये दंड सुनावला आहे.
नवी दिल्ली येथे एआय समिट भारत मंडपममध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी अर्धनग्न आंदोलन करत भारताची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केला.
सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील चितळी गावचे सुपुत्र, स्वर्गीय माजी सैनिक रणजीत निकम यांच्यावर धारदार शस्त्राने झालेल्या भ्याड हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाल्याच्या घटनेच्या निषेधार्थ मोर्चा काढण्यात आला.
पाटण तालुक्यातील प्रस्तावित निवकणे (एकात्मिक) उदंचन जलविद्युत (पंप स्टोरेज) प्रकल्प (२७०० मेगावॅट) विरोधात केरा विभागातील कृती समितीने आक्रमक भूमिका घेतली आहे.