राज्य शासनाच्या पाणी व स्वच्छता विभागाकडून प्राप्त झालेल्या सहा इलेक्ट्रिक घंटागाडीचे वितरण जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने करण्यात आले. जिल्ह्यातील कुडाळ, लिंब, अतित, खेडसह सहा ग्रामपंचायतींना या गाड्या मिळाल्या आहेत. या इ-घंटागाड्यांमुळे घनकचरा व्यवस्थापन प्रक्रियेस गती येणार आहे.
सविस्तर वृत्तसातारा शहरातून एक 18 वर्षीय युवती बेपत्ता झाल्याची नोंद शाहूपुरी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्तआजारपणाला कंटाळून वृद्धेने आत्महत्या केल्याची नोंद शाहुपुरी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्तफलटण तालुक्यातील कोळकी येथील हॉटेल कामगाराचा खून केल्याप्रकरणी दोनजणांना फलटण शहर पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी.
सविस्तर वृत्तसातारा शहरामध्ये 16 व 17 सप्टेंबर रोजी सार्वजनिक गणेश मंडळांचे गणपती विसर्जन होणार असून त्या पार्श्वभूमीवर शहरातील वाहतुकीत तात्पुरता बदल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्तप्लाझमा, बीम लाईट आणि लेझर बीम लाईटच्या प्रखर प्रकाशामुळे गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी झालेले व मिरवणुक पाहण्यास आलेले लहान मुले, वयोवृध्द, जेष्ठ नागरिक, सामान्य नागरिक यांच्या डोळ्यास इजा होवून त्यांच्या आरोग्यास धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याने सातारा जिल्ह्यातील गणेशोत्सव कालावधीत गणेश विसर्जन मिरवणुकी दरम्यान प्लाझामा, बीम लाईट आणि लेझर बीम लाईटच्या वापर करण्यावर जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी प्रतिबंध आदेश जारी केले आहेत.
सविस्तर वृत्तपाच दिवसांचे गणपती आणि गौराई यांना निरोप दिल्यानंतर सातार्यात देखावे पाहण्यासाठी सातारकर घराबाहेर पडू लागले आहेत. रिमझिमत्या पावसामध्ये जिवंत देखावे आणि गणरायाचे भव्य मोहक स्वरूप डोळ्यात साठवण्यासाठी गणेश भक्तांची गर्दी होत आहे.
सविस्तर वृत्तसातारा जिल्हा भाजप कार्यकारिणीच्या वतीने कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांच्या आरक्षण विरोधी वक्तव्याचा निषेध करण्यात आला. येथील शाहू चौकामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर हा निषेध करण्यात आला.
सविस्तर वृत्तदिल्लीचे मुख्यमंत्री तथा आम आदमी पक्षाचे संस्थापक-अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांना सर्वाच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. या आनंदाप्रित्यर्थ्य सातारा आम आदमी पक्षाच्यावतीने जिल्हा उपाध्यक्ष रतन पाटील आणि पदाधिकार्यांनी शिवतीर्थावर पेढे, साखरेचे वाटप करुन आनंद साजरा केला.
सविस्तर वृत्तठोसेघर येथे अवॉर्ड संस्था, सातारा आणि संयुक्त वनव्यवस्थापन समिती ठोसेघर यांच्यावतीने रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती ठोसेघर संयुक्त वनव्यवस्थापन समितीचे व्यवस्थापक प्रवीण चव्हाण यांनी दिली आहे.
सविस्तर वृत्त