अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद आणि डिजिटल मिडिया परिषदेच्या वतीने येत्या 20 सप्टेंबर 2024 रोजी पिंपरी चिंचवड येथे डिजिटल माध्यमातील पत्रकारांसाठी एक दिवसाच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. डिजिटल मिडियातील मान्यवर प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन करणार असल्याने हे शिबीर डिजिटल मिडिया क्षेत्रातील मैलाचा दगड ठरणार आहे
सविस्तर वृत्तगणेश विसर्जन मिरवणूकीमध्ये सर्व वाद्य वाजवण्यास शासनाने रात्री बारा वाजेपर्यंत परवानगी दिली आहे. बहुतांशी मंडळांनी आरास केलेली आहे. ते पाहण्यासाठी आजुबाजुच्या गावातील लोक येत असतात. रात्री १२ नंतर वाद्य वाजवण्यास बंदी केल्यामुळे आरास पाहण्यास दर्शक थांबत नाहीत.
सविस्तर वृत्तस्वारगेट वरून पुणे-बेंगलोर महामार्गावरून सांगलीकडे निघालेल्या शिवशाही बसला वाढेफाटा परिसरात टायर फुटून अचानक आग लागली. यामुळे महामार्गावर एकच गोंधळ उडाला. दुपारी एकच्या दरम्यान ही घटना घडल्याचे वृत्त आहे. सातारा पालिकेच्या अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी जाऊन आग आटोक्यात आणली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही.
सविस्तर वृत्तस्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने म्हसवे गावाच्या हद्दीत महामार्गाच्या पुलाखाली एका इसमावर कारवाई करून त्याच्याकडून दोन देशी बनावटीची पिस्टल, तीन जिवंत काडतुसे व दोन मोटरसायकल असा दोन लाख 25 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमध्ये बाकीचे संशयित अंधाराचा फायदा घेऊन पळाले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कोंबिंग ऑपरेशन दरम्यान ही कारवाई केली.
सविस्तर वृत्तहिंदू धर्मियांच्या आराध्य दैवताबाबत वादग्रस्त आक्षेपार्ह आणि अपमान जनक वक्तव्य केल्याबद्दल ज्ञानेश महाराव याला ताबडतोब अटक अटक करावी अशी मागणी भारतीय जनता पार्टीतर्फे आज पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्याकडे करण्यात आली.
सविस्तर वृत्तकोरेगावचे विद्यमान आमदार यांच्या राजकीय दबावापुढे लोटांगण घालून तेथील पोलीस त्यांचे कार्यकर्ते असल्याप्रमाणे काम करत आहेत. माझ्या कार्यकर्त्यांना अमिषे दाखवली जात आहेत, वेगवेगळ्या ऑफर दिल्या जात आहेत, विरोधकांची कुंडली काढून खोट्या तक्रारी दाखल केल्या जात आहेत, असा घणाघाती आरोप विधान परिषदेचे आमदार राष्ट्रवादीचे शशिकांत शिंदे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.
सविस्तर वृत्तपद्मभूषण क्रांतिवीर डॉ.नागनाथअण्णा नायकवडी यांनी ब्रिटिशांच्या विरुध्द केलेल्या अनेक आंदोलनापैकी एक रोमहर्षक प्रसंग रविवार, दि. 10 सप्टेंबर 1944 रोजी सातारा येथे घडला. या घटनेस 80 वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्त क्रांतिवीर डॉ.नागनाथअण्णांच्या सातारा जेलच्या तटावरुन क्रांतिकारक उडीचा शौर्य दिन आज हुत्मामा सहकारी साखर कारखाना वाळवाचे (जि. सांगली) चेअरमन वैभवकाका नायकवडी यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरा करण्यात आला.
सविस्तर वृत्तजरंडेश्वर नाका परिसरातील माता भिमाई आंबेडकर स्मारकाचा प्रश्न मार्गी लागला आहे. मंगळवारी पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतलेल्या बैठकीमध्ये सामाजिक न्याय भवनांच्या विभागामार्फत निधी आणण्यात येऊन स्मारकासाठी राज्य शासनाकडून जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून दिला जाईल व त्याचा अंतिम आराखडा राज्य शासनाकडे सादर करण्यात येईल, असे स्पष्ट केले.
सविस्तर वृत्तखाजगी सावकारकीच्या व्याज वसुलीतून एकाला वेळोवेळी दमदाटी व शिवीगाळ करून तसेच त्यांच्या आई-वडिलांकडून कोरे स्टॅम्प पेपर लिहून घेतल्याप्रकरणी महाबळेश्वर मध्ये तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे.
सविस्तर वृत्तस्वराज्याच्या कुलमुखत्यार व छत्रपती धर्मवीर संभाजीराजे यांच्या पत्नी महाराणी येसूबाई यांचे शृंगारपूर येथे भव्य स्फूर्ती स्थळ व्हावे, या मागणीसाठी सातार्याचे माजी उपनगराध्यक्ष सुहास राजेश शिर्के हे आक्रमक झाले आहेत. या मागणीसाठी 9 सप्टेंबर रोजी पासून त्यांनी रत्नागिरी येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर आमरण उपोषण सुरू केले आहे. शृंगारपूरचे सरपंच विनोद पवार या आंदोलनात सहभागी झाले आहे.
सविस्तर वृत्त