णेशोत्सवाच्या उत्साहामध्ये एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. मुंबईच्या लोअर परळ परिसरातील एका इमारतील भीषण आग लागली आहे. कमला मिल परिसरातील टाईम्स टॉव्हरमध्ये आग लागली आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पाहायला मिळत आहे. सकाळी 6.30 वाजता टाईम्स टॉव्हरला आग लागल्याची माहिती समोर येत आहे.
सविस्तर वृत्तपुणे शहरातील गणेशोत्सव राज्यभर नाही देशभरात लोकप्रिय आहेत. पुण्यातील गणेशोत्सव पाहण्यासाठी देशभरातील लोक येतात. दहा दिवस भाविकांच्या गर्दीने पुण्यातील रस्ते भरुन गेले असतात. यंदा पुण्यातील एका गणेश मंडळाने साकारलेल्या गणेशोत्सवातील देखाव्यावरुन वाद निर्माण झाला आहे. अमृतसर येथील ‘गोल्डन टेम्पल’चा देखावा या मंडळाकडून उभारण्याचे काम सुरु आहे.
सविस्तर वृत्तयेथील डेक्कन एज्युकेशन सोसायटी, पुणे संचलित न्यू इंग्लिश स्कूल सातारा मधील शिक्षक सुधाकर गुरव यांना यंदाचा शालामाऊली आ.ब.कंग्राळकर आदर्श शिक्षक पुरस्कार व गणित विज्ञान शिक्षिका सौ.अश्विनी वैभव कुलकर्णी यांना यंदाचा गोविंद बेडकिहाळ गणित, विज्ञान आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले .
सविस्तर वृत्तमहाराष्ट्र मोटार वाहन नियम 1989 मधील नियम 54 अ मध्ये सुधारणा करुन नवीन नियम निर्गमित करण्यात आले आहे. या अधिसूचनेमध्ये आकर्षक, पसंतीचा नोंदणी क्रमांक जारी करण्याच्या शुल्कामध्ये सुधारणा करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्तराज्याच्या गृह विभागाच्या अखत्यारित येणाऱ्या पोलीस दलातील भारतीय सेवेतील आयपीएस १७ पोलीस अधिक्षकांच्या बदल्या काही दिवसांपूर्वी करण्यात आल्या होत्या. त्यामध्ये साताऱ्याचे पोलीस अधिक्षक समीर शेख यांची उपायुक्त मुंबई शहर येथे बदली करण्यात आली होती. या आदेशानंतर अवघ्या दोन तासातच या बदलीला स्थगीती मिळाली.
सविस्तर वृत्तऐतिहासिक मोती तलावाचा परिसर पानवेलींनी झाकला गेला असून त्यामुळे येथे अस्वच्छता वाढली आहे. लोकप्रतिनिधी खासदार उदयनराजे भोसले यांच्या निवासस्थानासमोरील या परिसरात अस्वच्छतेचे साम्राज्य असून या वेलींचे निर्मूलन करणे गरजेचे असताना वृक्ष विभागाचे आळमटळम सुरू आहे. प्रशासनाने नेमलेल्या ठेकेदाराचे या कामाकडे अक्षम्य दुर्लक्ष असून याबाबत तीव्र संताप व्यक्त होत आहे.
सविस्तर वृत्तसातारा जिल्हा सहकारी बँकेचे चेअरमन खा. नितीन पाटील यांची महाराष्ट्रात राज्यसभा सदस्यपदी निवड झाल्यानंतर, त्यांचा आज दिल्ली येथील संसद भवनात शपथविधी झाला. उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी त्यांना शपथ दिली. यावेळी नितीन पाटील यांनी मराठी भाषेतून शपथ घेतली.
सविस्तर वृत्तजागतिक वारसास्थळ असणार्या कास फुलोत्सवाची पर्वणी आता पर्यटकांसाठी खुली झाली असून पर्यटकांना वेगवेगळ्या टप्प्यात विविध नैसर्गिक रंगीबेरंगी फुले पाहता येणार आहेत. कास पठारावरील फुलांच्या हंगामाचे उद्घाटन गुरुवारी सातार्याच्या उपवनसंरक्षक अदिती भारद्वाज यांच्या हस्ते झाले.
सविस्तर वृत्तराजपथावरून वारंवार निघणार्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मिरवणुकांमुळे राजपथावरील व्यापार्यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्याबाबतचे निवेदन त्यांनी पोलीस यंत्रणेला सादर केले होते. या प्रकरणाचा गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी निषेध केला.
सविस्तर वृत्तखाजगी सावकारीतून होणार्या मानसिक, शारीरिक त्रासाबद्दल सांगलीकर बंगला, महाबळेश्वर येथील अनिकेत विठ्ठल ढेबे या युवकाने या प्रकरणात न्याय न मिळाल्यास कुटुंबासह आत्मदहनाचा इशारा दिला आहे. या प्रकारास सर्वस्वी पोलीस प्रशासन जबाबदार राहील, असेही त्यांनी प्रसार माध्यमांना पत्रकार परिषदेत सांगितले.
सविस्तर वृत्त