जम्मू काश्मीरमध्ये विधानसभा निवडणूक होत आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडले आहे. लवकरच दुसऱ्या टप्प्यातील मतदान होणार आहे. दुसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रियेच्या सुरक्षेसाठी जात असताना बीएसएफच्या जवानांची ही बस बडगाम जिल्ह्यात खोल दरीत कोसळली आहे
सविस्तर वृत्तमालट्रकने चार गाड्यांना उडविले हा ट्रक चौथ्या कारला अडकून राहिला. यामुळे सुदैवाने ट्रक चालकाचा जीव वाचला, तर कारमधील लोकांचे प्राण ही वाचले. यात प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत..
सविस्तर वृत्तसातारा कारागृहात मी दुसऱ्या कारागृहामध्ये जाणार नाही असे म्हणत शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणात जिल्हा न्यायालयाने तरडफ येथील आरोपीला एक वर्षाचा सश्रम कारावास आणि दंडाची शिक्षा सुनावली.
सविस्तर वृत्तयुनेस्कोद्वारा जागतिक वारसा स्थळ 2024 यादित नामांकन पुर्व तयारीच्या अनुषंगाने किल्ले प्रतापगड या ठिकाणी स्वच्छता ही सेवा उपक्रमांतर्गत महास्वच्छता अभियानाचा शुभारंभ जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशिनी नागराजन यांच्या हस्ते करण्यात आला.
सविस्तर वृत्तशिवसेना उबाठा गटाच्या शिवसैनिकांनी गुरुवारी सातार्याच्या पूर्व भागातील खंडित पाणी पुरवठ्याच्या विरोधात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयात धरणे आंदोलन केले.
सविस्तर वृत्तआनेवाडी टोलनाक्यानजीक झालेल्या भीषण अपघातात वाई तालुक्यातील विरमाडे येथील सैन्य दलात असलेल्या विजय श्रीरंग सोनावणे (वय 37) या जवानाचा मृत्यू झाला.
सविस्तर वृत्तकेंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी अप्रेन्टिस योजनेबद्दल उद्योगजगतामध्ये जनजागृती व्हावी यासाठी सातारा मेगा फूड पार्क येथे येत्या शुक्रवारी २० सप्टेंबर रोजी अप्रेन्टिस योजना जनजागृती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
सविस्तर वृत्तजागतिक कृषी पुरस्कारामुळे महाराष्ट्राच्या शाश्वत शेतीच्या प्रयत्नांवर जगाने मोहोर उमटवली आहे. महाराष्ट्राने नेहमीचे भारतातील कृषी क्षेत्रात प्रयोगशीलता राबवल्याचे या पुरस्कारामुळे सिद्ध झाले, अशा शब्दांत राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रदान करण्यात आलेल्या जागतिक कृषी पुरस्कारांबद्दल कौतुकोद्गार काढले आहेत.
सविस्तर वृत्तमहायुतीच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या योजना सर्वसामान्य जनतेला केंद्रबिंदू मानून राबविण्यात येत आहेत.
सविस्तर वृत्तमहाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कर्मचार्यांना नियमित सेवा व सुविधा मिळत नसल्याने कंत्राटी कर्मचार्यांच्या सातारा जिल्हा मजदूर संघाचे सरचिटणीस रवींद्र माने यांच्या नेतृत्वाखाली बेमुदत धरणे आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू केले आहे.
सविस्तर वृत्त