गेल्या अकरा दिवसापासून भक्तीच्या जल्लोषात रंगलेल्या ऐतिहासिक शाहू नगरीने तब्बल 17 तासांच्या मिरवणुकीनंतर आवडत्या गणरायाला पुढच्या वर्षी लवकर या, असा गजर करत भावपूर्ण निरोप दिला.
सविस्तर वृत्तयेथील स्वरसंस्कार म्युझिक अकॅडमीतर्फे सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले (आप्पासाहेब) जन्मशताब्दी वर्षानिमित्त शनिवार दि. २१ व रविवार दि. २२ सप्टेंबर रोजी मराठी चित्रपट संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
सविस्तर वृत्तमहाराष्ट्र शासनाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर दलितमित्र व कर्मवीर-पद्मश्री दादासाहेब गायकवाड समाजभ्ाूषण पुरस्कार प्रदान करून गौरविलेल्या श्री जानाई मळाई शिक्षण संस्था साताराच्या प्रेरणास्थान कै.सौ.कलावती माने यांचा 30 वा पुण्यस्मृतीदिन विविध कार्यक्रमांचे आयोजन करून भावपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
सविस्तर वृत्ततळबीड पोलीस ठाणे हद्दीतील वहागाव ता. कराड येथे झोपडपट्टीत राहणारी व सायंकाळी पाचच्या सुमारास अचानक बेपत्ता झालेली अकरा वर्षे सहा महिने वयाची मुलगी शेजारच्या गावातील पोलीस पाटलाच्या सतर्कतेमुळे सुखरूप मिळवण्यात तळबीड पोलिसांना यश आले.
सविस्तर वृत्तदैनिक लोकमतच्या सोलापूर आवृत्तीचे कार्यकारी संपादक सचिन जवळकोटे यांच्या पत्नी व प्रसिद्ध साहित्यिका, पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्या सौ. सायली सचिन जवळकोटे ( वय ५४ ) यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने काल सोमवारी सकाळी साडेनऊ वाजता आकस्मिक निधन झाले. सोलापूर येथील वीरशैव लिंगायत रुद्रभूमी, रूपा भवानी रोड येथे अंत्यसंस्कार झाले.
सविस्तर वृत्तकोणी काहीही सांगितले तरी आता माघार नाही, माझ्या माघारीचे दोर जनतेने केव्हाच कापलेत. त्यामुळे तुमच्या भरवशावर आगामी विधानसभा निवडणुक लढवणारच, असा निर्धार राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष अमितदादा कदम यांनी मेढा येथे केला.
सविस्तर वृत्तऐतिहासिक शाहू नगरीच्या गणेशोत्सवाचे वैभव असलेली विसर्जन मिरवणूक मंगळवार दिनांक 17 रोजी अनंत चतुर्दशीला होत आहे. गणरायाला वाजत गाजत निरोप देण्यासाठी मानाच्या गणेश मंडळांसह सर्वच मंडळांची विसर्जन मिरवणुकीसाठी जोरदार तयारी सुरू आहे.
सविस्तर वृत्तआ. शशिकांत शिंदे हे स्वत: मोठे गुन्हेगार आहेत. राज्य शासनाच्या जमिनीत त्यांनी प्रचंड मोठा अपहार केला आहे. ते आजही फरार आहेत. त्यांना जामीन मिळालेला नाही. तसेच आ. शशिकांत शिंदे गणेशोत्सवानंतर दंड थोपटणार आहेत, या प्रश्नावर खासदारकीच्या निकाला दिवशीही त्यांनी दंड थोपटले होते, असा चिमटा आ. महेश शिंदे यांनी काढला.
सविस्तर वृत्तलिंगायत समाज हा हिंदू धर्माचा अविभाजक घटक असून, काही संघटना काही लोक लिंगायत हा वेगळा धर्म असल्याचे सांगत आहेत, याबाबत लोकांच्या जनजागृती व्हावी यासाठी हिंदू वीरशैव लिंगायत समाजातर्फे वीरशैव लिंगायत समाज सन्मान यात्राचे आयोजन करण्यात आलेले आहे.
सविस्तर वृत्तफलटण तालुक्यातील निंभोरे येथील ग्रामपंचायत वहिवाटीचा रस्ता अडवण्यात आला असून त्यांच्यावर कारवाई करावी, या मागणीसाठी सातारा जिल्हा परिषद कार्यालयासमोर कांबळे कुटुंबियांनी बेमुदत उपोषण सुरु केले आहे. दरम्यान, जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाला कुटुंबियांनी निवेदन दिले.
सविस्तर वृत्त