ठोसेघर येथे अवॉर्ड संस्था, सातारा आणि संयुक्त वनव्यवस्थापन समिती ठोसेघर यांच्यावतीने रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती ठोसेघर संयुक्त वनव्यवस्थापन समितीचे व्यवस्थापक प्रवीण चव्हाण यांनी दिली आहे.
सविस्तर वृत्तहिंदू धर्मियांच्या आराध्य दैवताबाबत वादग्रस्त आक्षेपार्ह आणि अपमानजनक वक्तव्य होत असताना मंचावर उपस्थित असताना खासदार शरद पवार यांनी मौन बाळगले, हिंदूंचा होणारा अपमान बघत बसले. म्हणजेच हिंदू दैवतांच्या होणार्या अपमानाला त्यांनी मूक संमती दिली.
सविस्तर वृत्तसातारा शहरात बुधवारी पाच दिवसांच्या गणरायाला भावपूर्ण निरोप देण्यात आला. तसेच गौराईचे दोन दिवसाचे स्वागत झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी तिला पारंपारिक पद्धतीने निरोप देण्यात आला. गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या, च्या जयघोषाने सातारा शहरासह जिल्ह्यामध्ये हे जयघोष ऐकायला येत होते.
सविस्तर वृत्तगळफास घेऊन एकाने आत्महत्या केल्याची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्तसातारा बसस्थानक परिसरात अज्ञाताचा मृत्यू झाल्याची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्तगणेश विसर्जन मिरवणुकीत वाजणाऱ्या वाद्यांच्या गोंगाटाने सातारा शहरातील कमकुवत इमारतींना धोका संभवतो. याबाबतची संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने दक्षता घेण्याच्या सूचना सातारा पालिकेने प्रदूषण नियंत्रण मंडळाला केल्या आहेत.
सविस्तर वृत्तविवाहितेचा जाचहाट केल्याप्रकरणी सहा जणांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्तसातारा शहरात ऐन गणेशोत्सवाची धामधूम आणि गणेश भक्तांची गर्दी असताना येथील मोती चौकामध्ये एका पिसाळलेल्या कुत्र्याने टप्प्याटप्प्याने 18 जणांचा चावा घेतला. यामुळे शहरात भीतीचे वातावरण तयार झाले आहे.
सविस्तर वृत्तमौजे शृंगारपूर येथील सर्वे नंबर 142/12 या जागेवर महाराणी येसूबाई यांचे स्फूर्ती स्थळाचा विस्तार करून त्याला स्मारकाचा दर्जा देण्यात यावा. जिल्हा प्रशासन पातळीवर हा प्रश्न प्रलंबित आहे. हा प्रश्न तातडीने सोडवला जावा याकरिता येसूबाई फाउंडेशनच्या वतीने रत्नागिरी जिल्हा प्रशासनाला एक महिन्याची मुदत देण्यात येत आहे.
सविस्तर वृत्तसातारा : गुरुवार दि. 12 सप्टेंबर रोजी कै. भाऊसाहेब हनुमंतराव कादबाने उर्फ भाऊ यांचा दशक्रिया विधी खळद, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे येथील कऱ्हा नदीच्या काठी सकाळी 8.30 वाजता होणार असल्याची माहिती कादबाने परिवाराने दिली आहे.
सविस्तर वृत्त