आमच्या महायुतीच्या सरकारने लाडकी बहीण योजना सुरु करुन माता - भगिनींच्या बँक खात्यात दरमहा दीड हजार देण्याचा निर्णय अंमलात आणला. पण त्यामुळे शरद पवारांच्या पोटात दुखायला लागले आहे. फुकटचे खायची सवय लावू नका, असे सुप्रिया सुळेही सांगू लागल्या आहेत. तसे पहायला गेले तर फुकटचे खायची सवय पवारानांच आहे.
सविस्तर वृत्तरचनात्मक समाज हा मानवी कल्याणासाठी नेहमीच प्रेरक असतो. या रचनात्मक समाजासाठी त्यांना मार्गदर्शन करणारे बहुआयामी व्यक्तिमत्व दिशादर्शक ठरतात. भाजपच्या गटनेत्या व आचार्य सिद्धी पवार हे असेच व्यक्तिमत्त्व आहे. विविध क्षेत्रात आपल्या कामाचा ठसा उमटवणार्या सिद्धी ताई यांनी अल्पावधीत केलेले कार्य प्रेरणादायी आहे, असे उद्गार अभिनेते स्वप्निल जोशी यांनी काढले.
सविस्तर वृत्तवाई, खंडाळा महाबळेश्वर विधानसभा मतदार संघात माझ्याच घरात सर्व सत्ता घेवून विद्यमान आमदारांनी लोकशाहीची थट्टा चालवली आहे. मीच आमदार, माझाच भाऊ खासदार, जिल्हा बँकेचा चेअरमन देखील आमच्याकडेच..,मीच दोन्ही साखर कारखान्याचा चेअरमन, आम्हीच बाजार समितीचे संचालक, आम्हीच सरपंच... अशा ‘मी’ पणाच्या नादात विद्यमान आमदारांनी सत्तेचे केंद्रीकरण करून मतदार संघात दहशत माजवली आहे,
सविस्तर वृत्तसातारा जिल्ह्यामध्ये खाजगी फायनान्स कंपनीचा कारभार बेफाम झाला असून यावर कोणताही शासकीय प्रतिबंध नाही. हा मनमानी कारभार तातडीने थांबवावा अन्यथा शिवसेना स्टाईलने त्यांना धडा शिकवला जाईल, असा इशारा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे जिल्हाप्रमुख सचिन मोहिते यांनी दिला आहे. याचे निवेदन त्यांनी शुक्रवारी निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांना सादर केले.
सविस्तर वृत्तलाडकी बहीण योजनेसाठी महायुतीच्या तिन्ही घटक पक्षांमध्ये कमालीचा श्रेयवाद सुरू आहे. राज्याची वित्तीय तूट दोन लाख तीस हजार कोटी इतकी प्रचंड आहे, तरीसुद्धा याकडे दुर्लक्ष करून राज्य शासन धडाधड वेगवेगळ्या योजना जाहीर करत आहे. राज्यात महिला अत्याचार वाढलेले असताना लाडक्या बहिणींच्या योजनेचे कौतुक केले जात आहे. या राज्यात महिला सुरक्षित नाहीत, अशी घनाघाती टीका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी केली.
सविस्तर वृत्तइराणी कप स्पर्धेतील सामन्यात चौथ्या दिवशी मुंबईच्या पृथ्वी शॉ याने रेस्ट ऑफ इंडिया विरुद्ध अर्धशतक केलं आहे. अनेक वर्षांपासून टीम इंडियातून बाहेर असलेल्या या युवा खेळाडूला या सामन्यातील पहिल्या डावात काही खास करता आलं नाही. पृथ्वी 7 चेंडूत 4 धावा करुन माघारी परतला. त्यामुळे पृथ्वीवर टीका करण्यात आली. मात्र पृथ्वीने दुसऱ्या डावात दमदार कमबॅक केलं.
सविस्तर वृत्तमाची पेठ परिसरातील चिकन दुकानांमध्ये भीषण स्फोट होऊन मुजमिल हमीद पालकर या इसमाचा अत्यंत दुर्दैवी मृत्यू झाला. या प्रकरणाचा सातारा शहर पोलीस कसून तपास करत असून गुरुवारी या संदर्भात दोघांना अटक करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्तवंचित बहुजन आघाडी हा पक्ष बरखास्त करून घटना तज्ञ भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू प्रकाश आंबेडकर यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या ऐक्यासाठी अध्यक्ष पद स्वीकारावे. या कृतीमुळे या पक्षाची महाराष्ट्रात ताकद वाढणार आहे. तुमच्यासाठी मी स्वतः अध्यक्षपद सोडायला तयार आहे, अशी थेट ऑफर केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी दिली आहे.
सविस्तर वृत्तभक्ती आणि शक्तीचे प्रतीक असलेल्या अश्विन महिन्यातील शुद्ध प्रतिपदा ते विजयादशमी अर्थात दसरा दरम्यान साजरा होणाऱ्या शारदीय नवरात्र उत्सवाला जय अंबे, जगदंबे ..च्या जयघोषात मोठ्या धार्मिक वातावरणात प्रारंभ झाला. सालाबादप्रमाणे सातारा जिल्ह्यातील अनेक देवी मंदिरांमध्ये हा भक्ती आणि शक्तीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे.
सविस्तर वृत्तसातारा जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांच्या प्रलंबित मागण्यासाठी दिव्यांग प्रेरणा सामाजिक संघटनेच्या वतीने पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या पोवई नाका येथील निवासस्थानासमोर पुन्हा ठिय्या आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाच्या वेळी पोलिसांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला तरी दिव्यांग बांधवांनी तेथेच बसकन मारली.
सविस्तर वृत्त