राज्य शासनाच्या मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेनुसार एप्रिल २०२४ पासून राज्यातील ७.५ अश्वशक्तीपर्यंतच्या कृषिपंपांना मोफत वीजपुरवठा करण्यात येत आहे. या योजनेचा पुणे प्रादेशिक विभागामध्ये पुणे, सोलापूर, सातारा, सांगली व कोल्हापूर जिल्हयातील १२ लाख १८ हजार ९९९ कृषिपंपधारक शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. या शेतकऱ्यांच्या एप्रिल ते जून २०२४ च्या त्रैमासिक वीजबिलांपोटी राज्य शासनाकडून ७५० कोटी ८६ लाख रुपयांची रक्कम प्राप्त महावितरणला प्राप्त झाली आहे.
सविस्तर वृत्तऐतिहासिक शाहू नगरीने शनिवारी विजयादशमीचा अर्थात दसर्याचा शाही बाज अनुभवला. हत्ती, घोडे, उंट, पारंपारिक वेशातील मावळे अशा शिवकालीन स्वरूपात सातार्यातून दसर्याची भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी खासदार उदयनराजे भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती.
सविस्तर वृत्तनागरिकांचे गहाळ झालेले सुमारे आठ लाखांचे मोबाईल हस्तगत करण्यात सातारा शहर पोलिसांना यश आले आहे.
सविस्तर वृत्तनवरात्र उत्सवानिमित्त वीरांगना प्रतिष्ठान च्या वतीने होम मिनिस्टरचा कार्यक्रम बसवेश्वर भवन या हॉल वर संपन्न झाला. या कार्यक्रमाला महिलांनी उत्स्फुर्त प्रतिसाद देत खेळात सहभाग घेतला. भरघोष बक्षिसे जिंकून पैठणी व लेडीज सायकल मिळाल्याने महिलांचा आनंद द्विगुणीत झाला.
सविस्तर वृत्तअनेक अडथळ्यांवर मात करुन आणि पाणीदार आमदार जयकुमार गोरे यांच्या पाठपुराव्याने टेंभू उपसा सिंचन योजनेच्या कामांना गती मिळाली आहे. या योजनेसाठी एकूण आठ टीएमसी पाणी आणि 7 हजार 370 कोटींचा निधी मंजूर केला आहे. या योजनेचा माण आणि खटावला सर्वाधिक लाभ होणार आहे. सुजलाम, सुफलाम माण - खटाव स्वप्नपूर्तीच्या दिशेने निघाला असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाईव्ह व्हिडिओद्वारे केले.
सविस्तर वृत्तलाडकी बहीण योजना जाहीर केली आणि तिथेही हे सावत्र भाऊ ही योजना बंद पाडण्यासाठी कोर्टात गेले. तिथून ते मुंबई हायकोर्टात गेले होते. आता नागपूरच्या कोर्टात गेले आहेत. काँग्रेसचे सुनील केदार यांनीच लाडकी बहीण योजनेविरोधात मुंबई कोर्टात याचिका दाखल केली, असा आरोप एकनाथ शिंदे यांनी केला.
सविस्तर वृत्तगुरुवर्य लक्ष्मणराव इनामदार उपसा सिंचन योजने(जिहे कटापूर योजना) करीता सन 2022-23 च्या दरसुचीनुसार रुपये 5409.72 कोटी रुपयांच्या तिस-यांदा सुधारित प्रशासकीय मान्यता राज्य मंत्रीमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत देण्यात आली. या निर्णयामुळे खटाव, माण, कोरेगांव आणि सातारा तालुक्यातील एकूण 176 गावांमधील 60,437 हेक्टर क्षेत्र ओलीताखाली येणार आहे. या तीसऱ्या सुधारित प्रशासकीय मंजूरीमुळे कायम दुष्काळी भाग म्हणून माण,खटाव तालुक्याला लागलेला कलंक निश्चितपणे दूर होण्यास मोठी मदत होणार आहे.
सविस्तर वृत्तसातारा-जावली मतदारसंघात विकासकामांचा डोंगर उभा करून सातत्याने कोट्यवधींच्या निधीची बरसात करणाऱ्या आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या माध्यमातुन सातारा व जावली तालुक्यातील ३२ विकासकामे मार्गी लावण्यासाठी ५ कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाच्या नागरी व ग्रामीण क्षेत्रातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्त्यांचा, गावांचा विकास करण्यासाठी या घटकांना मूलभूत सुविधा पुरवण्यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेतून हा निधी मंजूर केला आहे.
सविस्तर वृत्तराज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये झालेल्या काही निर्णयांमुळे अजित पवार नाराज असल्याची चर्चा आहे. कारण त्यांनी केवळ दहाच मिनिटांमध्ये कॅबिनेटची बैठक सोडली. अजित पवारांच्या नाराजीचा परिणाम महायुतीच्या नात्यामध्ये होईल का? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
सविस्तर वृत्तमहाराष्ट्राचे नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पाचगणीजवळील निसर्गरम्य कासवंडच्या (Kaswand Plateau) पश्चिमेस असणारे सुमारे ७० एकरचं विस्तीर्ण पठार रंगीबेरंगी फुलांनी बहरले आहे. सध्या पठारावर सप्तरंगी फुलांची उधळण झाली आहे. कास पठारावर फुलांचे सौंदर्य पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांची पावले आता कासवंडच्या पठाराकडे वळू लागली आहेत.
सविस्तर वृत्त