शालेय वाहतुकीच्या नियमानुसार स्कूल बसमध्ये 12 पेक्षा अधिक विद्यार्थी बसवण्याची क्षमता असते. त्यामुळे स्कूल बसमध्ये महिला सहायक असणे आवश्यकच असते. मात्र, स्कूल व्हॅनची क्षमता ‘सेव्हन प्लस वन’ इतकी आहे. त्यामुळे आरटीओ अधिकार्यांनी स्कूल व्हॅनमध्ये महिला सहायक असाव्यात, यासाठी जबरदस्ती करू नये, अशी मागणी पुण्यातील शालेय वाहतूक संघटनांनी केली.
सविस्तर वृत्तराज्यातील दुसरे सौरग्राम म्हणून खेड तालुक्यातील टेकवडी (जि. पुणे) गावाने मान पटकावला आहे. १२३९ लोकसंख्येच्या या गावातील सर्वच घरगुतीसह ७४ वीजजोडण्यांना सौर ऊर्जा प्रकल्पांतून वीजपुरवठा सुरु झाला आहे. महावितरणकडून राज्यातील १०० गावे १०० टक्के सौर ऊर्जेवर नेण्याची मोहीम सुरु असून त्यात टेकवडी गावाची निवड झाली होती. यामध्ये मान्याची वाडी (ता. पाटण जि. सातारा) नंतर राज्यातील दुसरे सौरग्राम म्हणून टेकवडी गावाने एकजुटीने ‘सौर’ उड्डाण यशस्वी केले आहे.
सविस्तर वृत्तगुरुवर्य लक्ष्मणराव इनामदार उपसा सिंचन योजनेसाठी महायुती सरकारने 2022-23 च्या दरसूचीनुसार 5409.72 कोटी रुपयांच्या निवेदला सुधारित प्रशासकीय मान्यता दिली आहे. नियामक मंडळाने या उपसा सिंचन योजनेचे कार्यक्षेत्र वाढवल्याने सातारा, कोरेगाव, माण, खटाव या चार तालुक्यातील 176 गावांचे 6004.37 हेक्टर क्षेत्र ओलीताखाली येणार आहे. ही योजना येत्या दीड वर्षात पूर्ण करावयाची आहे.
सविस्तर वृत्तमेगास्टार अमिताभ बच्चन यांचा रियालिटी शो कौन बनेगा करोडपती सीझन 16 सध्या चर्चेत आहे. शोचे पुढचे पाहुणे दुसरे कोणी नसून बॉलीवूड सुपरस्टार आमिर खान आणि त्याचा मुलगा जुनैद खान असणार आहेत. हे दोघेही बिग बींच्या वाढदिवसानिमित्त KBC च्या मंचावर काहीतरी खास करणार आहेत. आणि अमिताभ बच्चन यांना खास भेट देणार आहेत.
सविस्तर वृत्तवीजग्राहकांना अखंडित वीजपुरवठा करण्यासह दरमहाच्या चालू वीजबिलाची व मागील थकबाकी वसुली करावी. त्यासाठी पुढील सहा महिन्यांचा कृती आराखडा बनवून आणि त्यात सातत्य राखून वीजबिल वसुली करावी तसेच ग्राहक सेवेत सुधारणा करण्याचे निर्देश महावितरण पुणे प्रादेशिक संचालक भुजंग खंदारे यांनी दिले.
सविस्तर वृत्तकिल्ले सज्जनगड-ठोसेघर मार्गावर बोरणे घाटात कचर्यांचे ढिगारे दिसून येत आहेत. कोणी अज्ञाताने हा कचर्याचा ढीग टाकल्याने स्थानिक ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण आहे. या कचर्यामुळे परिसरातील वन्य जीवांना धोका असून पर्यटकांसह निसर्ग प्रेमींनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे.
सविस्तर वृत्तभारताच्या उद्योग क्षेत्रातील कोहिनूर, प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचं निधन झालं आहे. त्यांच्या निधनाच्या वृत्तामुळे संपूर्ण देशावर शोककळा पसरली आहे. रतन टाटा 86 वर्षांचे होते.
सविस्तर वृत्तदुचाकीला कुत्रे आडवे आल्याने दुचाकी घसरून राजू तानाजी कोरे (वय 43, रा. रहिमतपूर, ता. कोरेगाव) यांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात रहिमतपूर हद्दीतील चौकीचा आंबा येथे दि. 8 रोजी सायंकाळी सहा वाजता झाला. या अपघातात राजू कोरे यांची पत्नीसुद्धा गंभीर जखमी झाली आहे.
सविस्तर वृत्तमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत राज्य सरकारकडून पात्र महिलांना दरमहा दीड हजार रुपये दिले जात आहेत. सध्या दिवाळीनिमित्त सरकारकडून भाऊबीज दिली जात आहे.
सविस्तर वृत्तयुवकांचे राष्ट्र म्हणून भारताची आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख आहे. त्यामुळे देशाच्या लोकशाहीला युवकच बलशाली करू शकतात. आत्मनिर्भर आणि वैभवशाली राष्ट्रासाठी युवकांनी 100 टक्के मतदान करावे, असे आवाहन माजी खासदार पूनम महाजन यांनी केले.
सविस्तर वृत्त