भारतीय जनता पार्टीच्या सातार्यातील कार्यकर्ते-पदाधिकार्यांनी आज सातार्यात जल्लोष करून पेढे वाटून आनंद साजरा केला.
सविस्तर वृत्तवाई शहरात शिवसेनेच्या संवाद यात्रेचा जोरदार झंजावात पहायला मिळाला हजारो महिला पुरुषोत्तम जाधव यांच्या नेतृत्वाखाली वाई, खंडाळा महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघात परिवर्तन घडवण्यासाठी सिद्ध झाल्या असून शासनाने दिलेल्या अनेक योजनेमुळे महिला आनंदी आहेत.
सविस्तर वृत्तफलटण शहरासह तालुक्यामध्ये जनावरांची वाहतूक करणाऱ्या कुरेशी टोळीला सातारा जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपार करण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी हे आदेश दिले. तौफिक इम्तियाज कुरेशी वय 23, ईलाही हुसेन कुरेशी वय 25, अरबाज इम्तियाज कुरेशी वय28, ईनायत हुसेन कुरेशी वय 27 सर्व राहणार कुरेशी नगर, मंगळवार पेठ, फलटण या चौघांना हद्दपार प्राधिकरणाने तडीपार केले आहे.
सविस्तर वृत्तशिवछत्रपती चॅरिटेबल ट्रस्ट व जिजाऊ प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने अनंत इंग्लिश स्कूलच्या प्रांगणात आयोजित राजधानी रास दांडियाचे सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यासिनी नागराजन यांच्या हस्ते उद्घाटन झाले. रास दांडियाच्या पहिल्या दिवशी परिसरातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
सविस्तर वृत्तवंचित बहुजन आघाडीच्या वतीने आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांच्या मुलाखती दिनांक 9 रोजी सकाळी अकरा वाजल्यापासून घेतल्या जाणार आहेत, याबाबतची माहिती वंचित बहुजन आघाडीच्या वतीने देण्यात आली आहे. राज्य निवडणूक समन्वय समितीचे राज्य सदस्य प्राध्यापक सोमनाथ साळुंखे या मुलाखती घेणार आहेत.
सविस्तर वृत्तसातारा जिल्ह्यात राज्य नाट्य स्पर्धेचे केंद्र सातार्यात व्हावे, यासाठी खासदार उदयनराजे भोसले यांनी शासन दरबारी पाठपुरावा केला होता. त्याला यश आले आहे. महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक संचालनालयाच्या वतीने राज्य नाट्य स्पर्धेचे केंद्र म्हणून सातारा जिल्ह्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. या निर्णयाचे रंगकर्मींनी स्वागत केले आहे.
सविस्तर वृत्तकेंद्र शासनाने सोयाबीन खरेदीचा हमीभाव ठरवून दिलेला असताना सातारा जिल्ह्यात सोयाबीनचा तेवढा दर मिळत नाही. परिणामी शेतकर्यांचे प्रचंड नुकसान होत आहे. हमीभाव नियमन आणि नियंत्रण याकरिता सातार्यात सोयाबीन हमीभाव केंद्र सुरू करण्यात यावे, अशी मागणी रयत क्रांती संघटनेचे युवक जिल्हाध्यक्ष प्रकाश उर्फ सोनू साबळे यांनी जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे केली आहे.
सविस्तर वृत्तसातारा शहरातील 273 कुत्र्यांचे निर्बिजीकरण केल्याचा दावा सातारा पालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आला आहे. मात्र तरीही 11 महिन्यांमध्ये निर्बिजीकरणाचे काम समाधानकारक नसल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते गणेश वाघमारे यांनी केली होती. त्यानुसार आयोजित बैठकीमध्ये मुख्याधिकारी अभिजीत बापट यांनी आरोग्य विभागाची चांगलीच कान उघाडणी केली व संबंधित संस्थेला काळ्या यादीत टाका, अशी मागणी वाघमारे यांनी करताच त्यावर लवकरच कार्यवाही करण्याचे आश्वासन बापट यांनी दिले.
सविस्तर वृत्तसातारा जिल्हा शिक्षक सहकारी बँकेचे विद्यमान चेअरमन किरण यादव यांच्यावर पंधरा संचालकांनी अविश्वास ठराव आणला असल्याची माहिती मिळाली आहे. बँकेच्या नुकत्याच झालेल्या शताब्दी महोत्सवानंतर अचानक घडलेल्या ‘अविश्वास’ व ‘राजीनामा’ घटनांनी जिल्ह्यातील शिक्षक वर्गात खळबळ माजली आहे.
सविस्तर वृत्तपुणे व सोलापूर या जिल्ह्यांचा साखर उतारा सातारा जिल्ह्यापेक्षा कमी आहे. तरीसुद्धा तेथील शेतकर्यांना साडेतीन हजार रुपये प्रति टन भाव मिळत आहे. आगामी विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने शेतकर्यांना किमान या दराइतका किंवा त्यापेक्षा जास्त चार हजार रुपये टन ऊसाला भाव मिळावा, अशी एक मोठी मागणी शेतकरी संघटनेने सोमवारी केली.
सविस्तर वृत्त