सहकार क्षेत्रात काम करणार्या बँकांनी वित्तीय क्षेत्रात जर काटेकोरपणा पाळला तर त्याचा फायदा सहकारामध्ये काम करणार्या बँका, विकास सेवा सोसायटी यांना होऊन त्याची फळे प्रत्यक्षपणे शेतकर्यांना मिळतात. सातारा जिल्हा बँकेने शेतकर्याचे जीवनमान उंचावले आहे. गेली 17 वर्षे बँकेचा एनपीए शून्य आहे. त्यामुळे जिल्हा बँकेच्या संचालकांनी कोणतेही आर्थिक निर्णय घेताना काटेकोरपणे आर्थिक नियमांचे पालन करावे, असे कळकळीचे आवाहन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार बँकेच्या संचालक मंडळाला उद्देशून केले.
सविस्तर वृत्तमाची परिसरातील शनिवार पेठ येथील चिकनचे दुकान व सर्व्हिसिंग सेंटर येथे भीषण स्फोट होऊन एक ठार, तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. या स्फोटाचे कारण मात्र अस्पष्ट आहे. मुजमील हमीद पालकर वय 40 रा. गुरुवार परज असे मृत व्यावसायिकाचे नाव आहे. हरून बागवान व उमर बागवान हे दोघे या स्फोटामध्ये जखमी झाले असून त्यांना येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सविस्तर वृत्तदहिवडी तालुका माण गावाच्या हद्दीतील गोंदवले रस्त्यावर जातीवाचक शिवीगाळ करून लाकडी दांडक्याने मारहाण केल्याप्रकरणी दहिवडी येथील तिघांवर दहिवडी पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. किशोर सत्यवान लोखंडे आणि त्यांचे चुलत भाऊ किरण लोखंडे हे मारहाणीत जखमी झाले आहेत.
सविस्तर वृत्तमी बारामतीला मुजरा करत नाही, म्हणूनच विरोधक एक होऊन माझा द्वेष करतात. माझी लढाई मतदारसंघात विविध योजनांचे पाणी आणून दुष्काळमुक्तीची आहे. माझ्या कामात अडथळे आणून पाणी देण्याला विरोध करणार्यांविरोधात मी कायमच लढलो आहे. माझा मतदारसंघ दुष्काळमुक्त होईपर्यंत ही लढाई सुरूच राहील, असे प्रतिपादन आ. जयकुमार यांनी केले.
सविस्तर वृत्तराष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी मनोज अमृतराव देशमुख यांची निवड झाली.
सविस्तर वृत्तएकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प जावली आणि हिरकणी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मेढा येथे राष्ट्रीय पोषण आहार कार्यक्रम अंतर्गत सुदृढ बालक आदर्श पालक फॅशन शो स्पर्धा घेण्यात आली. जावली तालुक्यात पहिल्यांदाच असा कार्यक्रम असून देखील 40 हुन जास्त बालक व मातानी विविध वेशभूषा करत सहभागी होऊन उपस्थितांना पोषण आहार चे महत्व पटवून दिले.
सविस्तर वृत्तआळजापूर, ता. फलटण येथील महिलांनी पोवई नाक्यावरून थेट पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या निवासस्थानापर्यंत बुधवारी मोर्चा काढला. व्यसनमुक्त युवक संघाचे अध्यक्ष हभप विलास बाबा जवळ यांच्या मार्गदर्शनाखाली हा मोर्चा काढण्यात आला पालकमंत्र्यांनी आंदोलन महिलांची भेट घेत आळजापूर येथील परमिट रूम प्रकरणाचा फेर अहवाल पुन्हा मागवण्यात येईल, असे आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
सविस्तर वृत्तघटस्थापना म्हणजे भक्ती शक्तीचा चैतन्यमय उत्सव. या उत्सवाला दिनांक 3 ऑक्टोबर पासून सुरुवात होत आहे. यामुळे बाजारपेठेत रेलचेल वाढली असून घटासह माती आणि इतर पूजेचे साहित्य खरेदी करण्यासाठी राजवाडा परिसरातील बाजारपेठेत नागरिकांची गर्दी उसळली आहे. आनंद व मांगल्याचे प्रतीक असलेल्या दुर्गादेवीची प्रतिष्ठापना जवळ आल्याने दुर्गा भक्तांमध्ये उत्साह वाढला आहे.
सविस्तर वृत्तसातारा तालुक्यातील शेंद्रे येथे महामार्गाच्याकडेला अंधारात उभ्या असलेल्या ट्रकला पाठीमागून कारने जोरदार धडक दिली. घटनेनंतर अज्ञात ट्रकचालकाने लगेच पलायन केले. या अपघातात कारमधील एका वृद्धाचा जागीच मृत्यू झाला, तर पाचजण गंभीर जखमी झाले.
सविस्तर वृत्तदि.१ ऑक्टोंबर या जागतिक जेष्ठ नागरीक दिनाचे औचित्य साधून सातारा जिल्हा पोलीस दलाचे वतीने ज्येष्ठ नागरिकांसोबत साजरा करण्यात आला. यावेळी भरोसा सेल सातारा येथील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी जेष्ठ नागरीकांना जेष्ठ नागरीक कायदा २००७ मधील तरतुदीबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.
सविस्तर वृत्त