सातारा शहरातील फायनान्स कंपन्यांनी चुकीची वसुली प्रक्रिया राबवली आहे. त्यामुळे माणसांवर आत्महत्या करण्याची वेळ येत आहे, असा आरोप उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन मोहिते यांनी करत कोडोली येथील बजाज फायनान्स कंपनीचे कार्यालयाला टाळे ठोकले. तत्पूर्वी शिवसैनिकांनी आक्रमक भूमिका घेत कार्यालयाची तोडफोड केली.
सविस्तर वृत्तसातारा जिल्ह्यातील शेतकर्यांना पिकविम्याचे अद्याप पैसे मिळालेले नाहीत शेतकर्यांच्या प्रश्नाकडे महायुती सरकार केवळ घोषणा करून दुर्लक्ष करत आहे, असा आरोप उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन मोहिते यांनी करून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रस्त्यावरच बैठक मारली. शिवसैनिकांनी कोरेगाव कडे जाणारा रस्ता रोखून धरल्यामुळे काही काळ वाहतुकीची कोंडी झाली होती.
सविस्तर वृत्तशनिवार पेठेतील चिकनच्या दुकानात झालेल्या जोरदार स्फोटासंदर्भात अजूनही तर्कवितर्क सुरू आहेत. या स्फोटाची तीव्रता भयंकर होती. संबंधित चिकन दुकानाला परवानगी होती का? ती कोणाकडून देण्यात आली होती? या घटनेची वस्तुस्थिती तसेच या प्रकरणातील सामील लोक यांची राष्ट्रीय तपास यंत्रणेमार्फत चौकशी व्हावी अशी थेट मागणी पत्रकाद्वारे आम्ही सातारकर या नावाने माची व केसकर पेठेतील नागरिकांनी केली आहे.
सविस्तर वृत्तनवरात्रोत्सवासाठी शहरात गरबा, दांडिया नृत्याच्या तयारीला वेग आला असून, यासाठी शहरातील अनेक भागांत गरबासाठी प्रात्यक्षिके घेण्यात येत आहेत. या प्रात्यक्षिकांना तरुण-तरुणींचा मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे. घरोघरी होणारी घटस्थापना, तसेच सार्वजनिक मंडळांतर्फे घेण्यात येणार्या विविध उपक्रमांच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठा गजबजल्या असल्याचे आढळून आले.
सविस्तर वृत्तवेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनतर्फे आयोजित महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद फुटबॉल स्पर्धेत सहभागी होणार्या जुनियर मुलांच्या (15 वर्षा खालील) सातारा जिल्हा फुटबॉल संघाची निवड चाचणी रविवार दिनांक 13 ऑक्टोबर 2024 रोजी शानभाग स्कूल, सातारा मैदानावर सकाळी 7.30 वाजता आयोजित करण्यात आल्याची माहिती जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे सचिव प्रा. शिवराज गायकवाड यांनी दिली आहे.
सविस्तर वृत्तजीवन मरणाशी सततचा संघर्ष करणार्या थॅलेसेमिया रुग्णांना वेळेत औषध पुरवठा करण्याबाबत शासन पातळीवर उदासीनता आहे. गेल्या काही दिवसांपासून जिल्हा रुग्णालयात यावरची औषधे उपलब्ध नसल्याने सातार्यासह विविध जिल्ह्यांतील नागरिकांच्या जिवाशी खेळ सुरू आहे. या रुग्णांची बाहेरच्या जिल्ह्यात जाण्यासाठीची परवड थांबवण्यासाठी जिल्हा रुग्णालय प्रशासनाबरोबरच लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करणे आवश्यक आहे.
सविस्तर वृत्तकाँग्रेस पक्ष कार्यालयात निरीक्षक आमदार कुणाल पाटील यांची भेट घेऊन आमदार हिरामण खोसकर यांनी आपली मुलाखत दिली होती. काही महिन्यांपूर्वी झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत क्रॉस वोटिंग केल्याचा खोसकर यांच्यावर पक्षाचाच आक्षेप असून तेव्हापासून त्यांना पुन्हा उमेदवारी मिळण्याबाबत डळमळीत अवस्था असल्याचे पक्षातून बोलले जात होते.
सविस्तर वृत्तराष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून पुणे शहरात जोरदार मोर्चेबांधणी सुरु आहे. यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चलबिचल सुरु झाली आहे. महाविकास आघाडीच्या जागा वाटपात राष्ट्रवादी काँग्रेस (एसपी) या पक्षाला चार जागा मिळण्याची शक्यता आहे.
सविस्तर वृत्तमासिक वीजबिल शून्यवत करण्यासाठी सुरु असलेल्या प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत पश्चिम महाराष्ट्रात आतापर्यंत तब्बल ४१ हजार ११५ घरगुती ग्राहकांनी सहभाग घेतला असून त्यांचे मासिक वीजबिल शून्य होणार आहे. सद्यस्थितीत ९ हजार ८०८ घरगुती ग्राहकांकडे छतावरील ३९.२ मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित झाल्याने त्यांचे वीजबिल देखील शून्यवत झाले आहे.
सविस्तर वृत्तसातारा शहरातील रस्ते खड्डेमुक्त व्हावेत, प्रमुख रस्त्यांचे काँक्रीटीकरण करून वाहनचालक आणि नागरिकांची गैरसोय कायमची दूर व्हावी हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून रस्त्यांच्या काँक्रिटीकरणासाठी भरीव निधी उपलब्ध करून दिला आहे. आंगामी काळात शहरातील सर्व रस्ते खड्डेमुक्त करून शहरातील रस्त्यांची समस्या कायमस्वरूपी सोडवण्यासाठी प्राधान्य देणार आहे
सविस्तर वृत्त