सातारा शहरातील वेगवेगळ्या पाणीपुरवठा योजना आणि पाणी वितरिका यांना स्मार्ट जलमापके बसवली जाणार आहेत. या कामाचा ऑनलाइन शुभारंभ भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते केला जाणार आहे. हा कार्यक्रम सातारा पालिकेच्या छत्रपती शिवाजी सभागृहात सकाळी दहा वाजता आयोजित करण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ऑनलाईन या कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहेत.
सविस्तर वृत्तकिरोली तालुका कोरेगाव येथील ग्रामस्थांनी जिल्हा मार्ग 33 येथील रेल्वे मार्गावर नाली क्रमांक 339 ही तीन मीटर रुंद व तीन मीटर उंच आहे. या नालीची उंची तात्काळ वाढवण्यात यावी. कारण ग्रामस्थांना वाहतुकीला अडथळा येत आहे. या संदर्भात रेल्वे प्रशासन यांनी तातडीने कार्यवाही करावी अन्यथा तारगाव स्टेशन येथे रेल्वे रोको करण्यात येईल, असा इशारा किरोली ग्रामस्थांनी दिला आहे.
सविस्तर वृत्तखेड ग्रामपंचायतीच्या हद्दीतील दिव्यांग महिला लतिका जगताप यांचे घराचे राहते शेड खेड ग्रामपंचायत च्या वतीने विरोध करूनही पाडण्यात आले. या कारवाईचे प्रत्यक्ष कारण समजू शकले नाही मात्र या घटनेच्या निषेधार्थ दिव्यांग बांधवांनी पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन केले. सातारा शहर पोलिसांनी या आंदोलनात तातडीने हस्तक्षेप केला.
सविस्तर वृत्तसातारा शहरातील फळभाजी व्यापारी सामाजिक कार्यकर्ते व संजीवन बहुउद्देशीय सामाजिक सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष रवींद्र कांबळे यांनी निराधारांच्या पुनर्वसनाचा संकल्प सोडला असून या कामासाठी समाजातून मोठा निधी उभा राहावा यासाठी ते प्रयत्नरत आहेत.
सविस्तर वृत्तसातारा शहरात पडलेल्या खड्ड्यांमध्ये मंगळवारी चक्क गोट्यांचा डाव रंगला. दलित पँथर सातारा यांच्यावतीने शहरातील ठिकाणी पडलेल्या खड्ड्यांचा निषेध या अभिनव आंदोलनाद्वारे करण्यात आला. सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच सातारा नगरपालिका या दोन्ही आस्थापनांचा निषेध करण्यात आला. खड्ड्यात गोट्या खेळून करण्यात आलेल्या आंदोलनाची आज सातारा शहरात जोरदार चर्चा होती.
सविस्तर वृत्तसातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.
सविस्तर वृत्तयेत्या विधानसभा निवडणुकीत रयत क्रांती संघटनेचा कोणताही वापर आम्ही होऊ देणार नाही. यंदा कोणत्याही परिस्थितीत सातारा जिल्ह्यातील ८ विधानसभा आम्ही स्वबळावर लढविणार, असा इशारा रयत क्रांती संघटनेचे युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रकाश उर्फ सोनू साबळे यांनी दिला आहे.
सविस्तर वृत्तसातारा पालिकेकडून पाणी योजनेचे अत्याधुनिकीकरण (अॅटोमेशन) केले जात असताना आता विद्युत विभागाकडूनही शहरातील पथदिव्यांना तंत्रज्ञानाची जोड दिली जात आहे. या अत्याधुनिक प्रणालीमुळे कोणता दिवा बंद, कोणता सुरू हे एका क्लिकवर समजणार असून, दिव्यांची तातडीने दुरुस्तीही करता येणार आहे.
सविस्तर वृत्तजिल्ह्यातील सहकारी संस्थांची मातृसंस्था, आपल्या उत्तम प्रशासन, उत्कृष्ठ कार्यपध्दती व सुयोग्य नियोजनामुळे राज्यातच नव्हेतर देशातील सहकार क्षेत्रात सातारा जिल्हा बँक अग्रेसर आहे. बँकेवरील ग्राहकांचा विश्वास आणि सहकार्यामुळे बँक आपला अमृत महोत्सव समारंभ अत्यंत उत्साहाने साजरा होत आहे.
सविस्तर वृत्तयेथील लोकनेते बाळासाहेब देसाई ग्रामसचिवालय इमारतीच्या नूतनीकरण, नामकरण समारंभाचे उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले.
सविस्तर वृत्त