छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट तेरावे वंशज खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्या सुविद्य पत्नी श्री. छ. सौ. दमयंतीराजे भोसले यांचे प्रयागराज येथील कुंभमेळ्यात संत महंतांनी उत्साही वातावरणात स्वागत केले.
सविस्तर वृत्तयेथील आगाराची वाठार स्टेशन-भाडळेमार्गे- कोरेगाव बस बुधवारी दुपारी हासेवाडी (ता. कोरेगाव) येथे प्रवासी चढ-उतार करताना अचानक बसने पेट घेतला.
सविस्तर वृत्तमीरा-भाईंदर महानगरपालिकेचे माजी प्रभाग समिती सदस्य सोमनाथ बळवंत पवार यांनी नागठाणे येथील घाडगे रुग्णालय तात्काळ बंद करावे.
सविस्तर वृत्तआम्ही पुणेकर, इंडो-जपान समन्वयक समिती व सातार्यातील मराठा बिजनेस फोरम यांच्या संयुक्त सहकार्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर होणार्या इंडो-जपान शिवस्वराज रथयात्रेचा सातार्यामध्ये बुधवारी खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्या उपस्थितीत शानदार शुभारंभ झाला.
सविस्तर वृत्तमहाराष्ट्रासह उत्तर कर्नाटकातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या औंध येथील श्री यमाई देवीचा वार्षिक रथोत्सव मोठ्या उत्साही वातावरणात हजारो भाविकांच्या उपस्थितीत झाला. यावेळी ‘आई उदे ग अंबे उदे’च्या जयघोषाने अवघी औंधनगरी आज दुमदुमून गेली होती.
सविस्तर वृत्तस्वस्थ राष्ट्र उभारणीच्या ध्येयाने काम करणाऱ्या पोदार इंटरनॅशनल स्कूलच्या चिमुकल्यांनी मंगळाई टेकडीवरील झाडांना पाणी घालून श्रमदान केले. इयत्ता पाचवी मधील सुमारे अडीचशे विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी यामध्ये भाग घेतला.
सविस्तर वृत्तलोणंद नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा सीमा वैभव खरात यांनी ऐन संक्रांतीच्या सणादिवशीच नगराध्यक्षपदाचा राजीनामा जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्याकडे दिला, तर उपनगराध्यक्ष रवींद्र क्षीरसागर यांनीही आज आपल्या पदाचा राजीनामा नगराध्यक्षा सीमा खरात यांच्याकडे दिल्याने लोणंद नगरपंचायतीचे नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष पद रिक्त झाले आहे.
सविस्तर वृत्तउत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथे कुंभमेळ्याचा आज दुसरा दिवस आहे. आजच्या दिवशी पवित्र स्थानासाठी येथे कोट्यवधी भाविकांनी गर्दी केलेली असतानाच महाराष्ट्रातील एका नेत्याचं प्रयागराजमध्ये कुंभमेळ्यात हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. शरद पवारांच्या पक्षाचे नेते आणि सोलापूरचे माजी महापौर महेश कोठेंचं निधन झालं आहे.
सविस्तर वृत्तवाहनांच्या नंबर प्लेटमध्ये छेडछाड व बनावटगिरी करुन होणारे गुन्हे कमी करणे, रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांची ओळख पटविणे व राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीकोनातून दि. 1 एप्रिल 2019 पूर्वी उत्पादित झालेल्या सर्व जुन्या नोंदणीकृत वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट दि. 31 मार्च 2025 पूर्वी बसविणे बंधनकारक असल्याचे प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे.
सविस्तर वृत्तशासनाच्या विविध योजना, उपक्रम, शासकीय निर्णय इत्यादी माहिती लोकांपर्यंत जलदगतीने आणि प्रभावीरीत्या पोहोचविण्यासाठी शासनाचे डिजीटल माध्यम धोरण लवकरच तयार करण्यात येईल. यासाठी यापुढील काळात कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्राचा वापर करण्यात येईल.
सविस्तर वृत्त