माझ्या प्रत्येक वाटचालीत तुमचा पाठिंबा असून कामातही आपण वारंवार हातभार लावत आहात. त्याच ताकतीने भाजपा सदस्य महाअभियानात हातभार लावणे गरजेचे आहे.
सविस्तर वृत्तजिल्ह्यातील दूध उत्पादकांचे दूध दर अनुदान त्वरित वितरित करण्यात यावे. अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयावर गाई मशीन सह लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा रयत क्रांती संघटनेचे जिल्हा युवक अध्यक्ष प्रकाश उर्फ सोनू साबळे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
सविस्तर वृत्तआचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठीमध्ये पहिले ‘दर्पण’ हे वृत्तपत्र सुरु केले. त्या पार्श्वभूमीवर 6 जानेवारी हा पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो.
सविस्तर वृत्तनागठाणे विभाग पत्रकार संघाच्यावतीने प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही पत्रकार दिनाचे औचित्य साधून विविध क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कार्य करणार्या सन्माननीय व्यक्तींना पुरस्कार व पत्रकार संघाचा दिनदर्शिका प्रकाशन सोहळा सोमवार, दि. 6 जानेवारी रोजी सायंकाळी 6 वाजता नागठाणे, ता. सातारा येथील नागठाणे कॉलेजच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्तजिल्ह्यात नववर्ष सुरू झाल्यानंतर किमान तापमानात उतार आला असून, महाबळेश्वरला १३.८ तर सातारा येथे १४.८ अंशांची नोंद झाली. तर चार दिवसांत साताऱ्याचे किमान तापमान चार अंशांनी घसरले आहे.
सविस्तर वृत्तलाडकी बहीण योजनेने महायुतीचा सत्तेतील वाटा अधिक आश्वासक केला. सत्तेचं फळ महायुतीतील तीनही घटक पक्षांना चाखायला मिळाले. पण आता ‘गरज सरो नी वैद्य मरो’ अशी काहीशी अवस्था यातील काही बहिणींच्या वाट्याला येण्याची शक्यता आहे.
सविस्तर वृत्तबीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाशी संबंधित खंडणी केसमध्ये तुरुंगात असलेल्या वाल्मिक कराडनं त्याच्यासोबत २४ तास एखादी खासगी व्यक्ती असावी, अशी मागणी न्यायालयाकडे केली.
सविस्तर वृत्तछत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा वध करताना जी ऐतिहासिक वाघनखे वापरली होती ती वाघनखे लंडनहून भारतात आणल्यानंतर गतवर्षातील १९ जुलैपासून साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात ठेवली आहेत.
सविस्तर वृत्तक्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची आणखी पाच वर्षांनी द्विशताब्दी साजरी होणार आहे. त्यापूर्वी त्यांच्या स्मारकाचे काम पूर्ण करा.
सविस्तर वृत्तमहाराष्ट्रातील मुख्यमंत्री आणि पंतप्रधान सडक योजनेच्या कामांमध्ये सुधारणा करण्यासाठी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी मंत्रिमंडळाच्या सचिव-अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली.
सविस्तर वृत्त