येथील मंगळवार पेठेतील अक्षय अशोक नलावडे (वय २६ वर्षे ) या युवकाच्या मृत्यूप्रकरणी मंगलमूर्ती हॉस्पिटलमधील डॉक्टर भूषण पाटील यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
सविस्तर वृत्तजिल्ह्यातील सुमारे साडेतीन हजार शेतकरी ठिबक सिंचनाच्या अनुदानापासून वंचित आहेत. केंद्र व राज्य सरकारचे 9 कोटींचे अनुदान थकले आहे.
सविस्तर वृत्तमहाराष्ट्र शासनाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर दलितमित्र व कर्मवीर दादासाहेब गायकवाड समाजभूषण पुरस्कार प्रदान करून गौरवलेल्या तसेच पश्चिम महाराष्ट्र मध्ये शैक्षणिक- सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या श्री जानाई मळाई सोशल अँड एज्युकेशन फाउंडेशन, (जेमसेफ) सातारा संस्थेच्या श्री.छ.प्रतापसिंहमहाराज राजेभोसले हायस्कूल, समाजभूषण-दलितमित्र शिवराम माने विद्यामंदिर, कै. सौ. कलावती माने बालविकास केंद्र, माने कॉलनी सातारा या शैक्षणिक संकुलात नववर्षाचे औचित्य साधून, भारतीय संस्कृती व परंपरेचे जतन करण्याच्या हेतूने आयोजित करण्यात आलेला माता-पिता पाद्यपूजन व संकल्प सोहळा पारंपारिक पद्धतीने उत्साहात संपन्न झाला.
सविस्तर वृत्तश्री सेवागिरी महाराजांच्या 77 व्या पुण्यस्मरणानिमित्त श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्ट व स्मार्ट एक्स्पो यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय सेवागिरी कृषी व पशुपक्षी प्रदर्शनास चांगला प्रतिसाद मिळत आहे.
सविस्तर वृत्तयंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला एकतर्फी यश मिळाले. मात्र महायुतीमध्ये मंत्रिमंडळ विस्तार आणि जागावाटपावरुन नाराजी पसरली आहे. यामध्ये अजित पवार गटाचे जेष्ठ नेते छगन भुजबळ यांनी देखील आपली नाराजी माध्यमांसमोर व्यक्त केली आहे.
सविस्तर वृत्तप्रजासत्ताक दिनानिमित्त दरवर्षी 26 जानेवारीला राज्यातील शाळांमध्ये सुट्टी दिली जाते. पण आता ही सुट्टी रद्द करण्याचा निर्णय राज्यातील फडणवीस सरकारने घेतला आहे.
सविस्तर वृत्तविनायक चतुर्थी पौष महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीला साजरी केली जाते. या दिवशी गणपती बाप्पाची विशेष पूजा करून बाप्पाला गोडाचा नैवेद्य दाखवला जातो. शिवाय अनेक महिला या दिवशी उपवाससुद्धा करतात.
सविस्तर वृत्तआधार कार्ड भारतातील प्रत्येक नागरिकाची एक ओळख बनलं आहे. मात्र आता आधार कार्ड सारखा युनिक आयडी प्रत्येक पायाभूत सुविधा प्रकल्पासाठी तयार करण्याचा निर्णय आज घेण्यात आला.
सविस्तर वृत्तसातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांची पुणे जिल्हाधिकारी म्हणून बदली झालेली आहे. त्यांच्या जागेवर संतोष पाटील यांची वर्णी लागली आहे.
सविस्तर वृत्तनव वर्ष २०२५ चं स्वागत भाविकांनी देवदर्शनाने केल्याचे पाहायला मिळाले. पंढरपूरमध्ये विठुरायाच्या दर्शनासाठी भाविकांनी सकाळपासूनच मोठी गर्दी केली होती.
सविस्तर वृत्त