सातारा जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यालयांमध्ये राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांच्या अधिकृत प्रतिमा सन्मानपूर्वक लावण्यात याव्यात, अशी मागणी भाजप सातारा शहर मध्य मंडल अध्यक्ष अविनाश खर्शीकर यांनी केली.
सविस्तर वृत्तसातारा रनर्स फौंडेशनच्यावतीने दरवर्षी आयोजित करण्यात येणारी आणि संपूर्ण देशभरात लोकप्रिय असलेली पीबीजी सातारा हिल हाफ मॅरेथॉन स्पर्धा यंदा आपल्या १५ व्या वर्षात पदार्पण करत असून, रविवार, दि. ६ सप्टेंबर २०२६ रोजी ही स्पर्धा उत्साहात पार पडणार आहे.
सविस्तर वृत्तसातारा जिल्ह्यासह महाराष्ट्राच्या स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या ज्ञात-अज्ञात हुतात्म्यांच्या कार्याची माहिती भावी पिढ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी चले जाव चळवळ स्मारक व क्रांती स्मारक परिसराचा सर्वांगीण विकास व सुशोभीकरण करण्यात यावे
सविस्तर वृत्तमहावितरणच्या सातारा मंडल व वडूज विभागातील कामकाजात मोठ्या प्रमाणावर अनियमितता, नियमबाह्य कामे आणि आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा गंभीर आरोप शेतकरी हक्क परिषद व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला आहे.
सविस्तर वृत्तआगामी सार्वजनिक गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सातारा सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने मांडलेल्या विविध मागण्यांबाबत नगराध्यक्ष अमोल मोहिते यांनी सकारात्मक भूमिका घेतली असून, संबंधित विभागांना आवश्यक त्या तातडीच्या कार्यवाहीच्या सूचना दिल्या आहेत.
सविस्तर वृत्तजागतिक वारसास्थळाचा मान लाभलेल्या सातारा जिल्ह्यातील प्रसिद्ध कास पठारावर फुलांचा बहर पाहण्यासाठी पर्यटकांची प्रतीक्षा आता संपली आहे.
सविस्तर वृत्तभारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी सुरु केलेल्या 'हर घर तिरंगा.., घर घर तिरंगा' अभियानांतर्गत राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत आज सकाळी राजवाडा ते पोवई नाका अशी भव्य तिरंगा ध्वज दुचाकी रॅली अभूतपूर्व उत्साहात संपन्न झाली.
सविस्तर वृत्तजेएसपीएमच्या नार्हे टेक्निकल कॅम्पस, पुणे येथे सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेल्या डॉ. (प्रा.) प्रतिभा अमृत रसाळ यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पीएच.डी. (विद्यावाचस्पती) पदवी संपादन केली.
सविस्तर वृत्तमाणगंगा नदीपात्रातील यात्रा पठाण परिसरातील बंधारा तोडल्याच्या प्रकरणावरून म्हसवडमध्ये प्रशासनाविरोधात संताप व्यक्त होत आहे.
सविस्तर वृत्तशैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असणार्या श्री जानाई मळाई शिक्षण संस्थेच्या वतीने ऑगस्ट क्रांतिदिन आणि संस्थेचे मार्गदर्शक आमदार महेशदादा शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शनिवार, दिनांक 08 ऑगस्ट रोजी भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
सविस्तर वृत्त