न्यायालयाच्या आदेशाचा भंग करून वडूज, ता. खटाव येथे बेकायदेशीररित्या काही व्यक्तींकडून बांधकाम केले जात असल्याने, संबंधित बांधकाम थांबवण्यासह संशयीतांवर कारवाईच्या मागणीसाठी प्रजासत्ताक दिनी आत्मदहन करण्याचा इशारा सौ. शोभाताई गुरव यांनी दिला आहे.
सविस्तर वृत्तसातारा जिल्ह्यासह महाराष्ट्रात चर्चिल्या गेलेल्या संजय शेलार खून प्रकरणातील पाच संशयितांना पोलिसांनी जेरबंद केले आहे.
सविस्तर वृत्तसातारा शहरा नजीकच्या क्षेत्र माहुली येथे जमिनीच्या वादातून रिव्हाॅल्व्हर मधून हवेत फायरिंग झाल्याने परिसर हादरून गेला. फायरिंग झाल्यानंतर याठिकाणी तुंबळ हाणामारी झाली.
सविस्तर वृत्तमहिलेस मारहाण केल्याप्रकरणी एका विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्तएकास विनाकारण मारहाण केल्याप्रकरणी दोन अज्ञातांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्तअपघातामध्ये एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी दुचाकी चालकावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्तविवाहितेचा जाचहाट केल्याप्रकरणी चार जणांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्तविडणी, ता.फलटण येथील 25 फाटा ऊसाच्या शेतात अज्ञात महिलेचा अर्धवट अवस्थेत मृतदेह आढळून आला असून उसाच्या शेतात महिलेच्या साडी जवळ नारळ, कुंकू, गुलाल, महिलेचे कापलेले केस, तेलाचा दिवा, काळी बाहुली, सुरी मिळून आल्याने सदर प्रकार अघोरी नरबळी असावा, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
सविस्तर वृत्तसैफ अली खानवरील हल्ल्याप्रकरणी एका संशयित आरोपीला अटक करण्यात आली आहे. प्राथमिक माहितीनुसार वांद्रे येथून आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या घटनेला 30 तासांहून अधिक कालावधी उलटल्यानंतर पोलिसांना पहिलं यश मिळालं आहे.
सविस्तर वृत्तफळणी, ता.जावली येथील संजय गणपत शेलार (वय 32) यांच्या खून प्रकरणी अरुण कापसे यांना गुरुवारी सांयकाळी अटक करण्यात आली. 15 दिवसांपूर्वी मेढा पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.
सविस्तर वृत्त