अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे राज्यात फेब्रुवारी 2025 ते मे 2025 या कालावधीत 3 लाख 98 हजार 603 बाधित शेतकर्यांच्या 1 लाख 87 हजार 53.21 हेक्टर क्षेत्रातील शेत पिकांच्या नुकसानीपोटी राज्य शासनाने 337 कोटी 41 लाख 53 हजार इतक्या निधीस मान्यता दिली आहे.
सविस्तर वृत्तपाणीपुरवठा योजनेच्या केलेल्या कामाचे थकीत बिल सरकारकडून वेळेत न मिळाल्याने हर्षल पाटील या युवकाने टोकाचे पाऊल उचलून स्वतःचे जीवन संपवल्याची घटना अत्यंत वेदनादायी आहे
सविस्तर वृत्तग्रामीण भागातील लोकांच्या जीवनात आर्थिक परिवर्तन करण्यासाठी जिल्हा बॅंकेचे नेहमीच सहकार्य राहील, अशी ग्वाही खासदार नितीन पाटील यांनी दिले.
सविस्तर वृत्तसातारा जिल्ह्यातील कराडमध्ये एक धक्कादायक घटना घडली. कृष्णा नदीच्या पुलावरून एका तरुणीने नदीत उडी मारली. ही घटना सोमवारी रात्री साडेनऊच्या सुमारास घडली असून कल्पना बाळाप्पा वाघमारे (वय 26) असं या तरुणीचं नाव आहे.
सविस्तर वृत्तपाटण तालुक्यातील मल्हारपेठ, मारूल हवेली परिसरातील गावात बिबट्याचा वावर चांगलाच वाढला आहे. नागरिकांना त्याचे वारंवार दर्शन होत असून बिबट्याकडून पाळीव प्राण्यावर हल्ल्याचे सत्र सुरूच आहे.
सविस्तर वृत्तभारतात दरवर्षीत अडीच लाख मृत्यू कावीळीमुळे होतात म्हणजे तिस सेकंदात एक मृत्यू होत आहे. कावीळ हा गंभीर आजार असून प्रत्येक व्यक्तीने कावीळीची तपासणी करून घेणे व लसीकरण करुन घेणे गरजेचे असून कावीळीचा संसर्ग रोखण्याकरीता समाजाचा सहभागही महत्वाचा आहे.
सविस्तर वृत्तविद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शाळा परिसरात उपाययोजना करण्याबाबत सातारा शहरातील विविध शाळांमधील मान्यवरांनी आज पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची भेट घेवून त्यांना निवेदन दिले.
सविस्तर वृत्तराज्यात मागील दोन दिवसांपासून पावसाने थोडा विश्रांती घेतल्याचे दिसत आहे. कोकण आणि पूर्व विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये अपवाद वगळता, बहुतांश भागांत उन्हाचे दर्शन झाले.
सविस्तर वृत्तभारतातील सर्व ठिकाणी राखी पाकिटांचे वितरण लवकरात लवकर होण्यासाठी सातारा टपाल विभागातर्फे राखी पाकिटे स्वीकारण्यासाठी खास स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्तजिल्हा विधी सेवा प्राधिकरण व यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ सोशल वर्क जकातवाडी, सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने २५ जुलै जकातवाडी, ता. जि. सातारा येथे नालसा, मालसा योजना, एडीआर पध्दती आणि त्याचे फायदे, नागरिकांची मुलभूत कर्तव्ये या विषयांवर जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सविस्तर वृत्त