जिल्हा ओबीसी संघटनेचे जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन
सातारा जिल्हा ओबीसी संघटनेच्या वतीने सोमवारी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन करण्यात आले.
सातारा : सातारा जिल्हा ओबीसी संघटनेच्या वतीने सोमवारी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी ओबीसी आरक्षणाचा विषय राज्य शासनाने तातडीने सोडवावा, या मागणीकडे लक्ष वेधले. सातारा जिल्हा ओबीसी संघटनेचे अनिल लोहार व बबनराव झोरे यांनी या मागणीसाठी उपोषण सुरू केले आहे.
संघटनेच्या सदस्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन करून घोषणाबाजी केली. साताऱ्यात आंदोलकांनी पोवई नाक्यावर छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन करून जिल्हाधिकारी कार्यालयावर उपोषण सुरू केले आहे .
जिल्हा प्रशासनाला सादर करण्यात आलेल्या निवेदनात नमूद आहे की, धनगर आरक्षणाच्या संदर्भात राज्य राज्य शासनाने तातडीने निर्णय घ्यावा. धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी संघटनेच्या वतीने वेळोवेळी निवेदन व आंदोलन करण्यात आले आहे. या तातडीच्या महत्त्वाच्या प्रश्नांवर राज्य शासनाने चिकित्सक अभ्यास करून तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.