नांदेड आणि हिंगोली भूकंपाच्या धक्क्याने हादरले आहे. हिंगोली आणि नांदेडमध्ये आज सकाळीच्या सुमारास भूकंपाचे धक्के बसले. साखर झोपेत असताना भूकंपाचे धक्के बसल्यामुळे नागरिकांनी घराबाहेर धाव घेतली. नांदेडच्या हदगाव तालुक्यातील २ गावांना भूकंपाचे धक्के बसले.
सविस्तर वृत्तभाजप, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट व घटकपक्षांच्या महायुतीचे सातारा- जावली विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रचारार्थ खा. श्रीमंत छ. उदयनराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रचार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवार दि. २३ ऑक्टोबर २०२४ रोजी सायंकाळी ५ वाजता शेंद्रे येथील स्व. अभयसिंहराजे भोसले सांस्कृतिक हॉल येथे हा मेळावा होणार आहे, अशी माहिती सातारा लोकसभा समन्वयक सुनील काटकर यांनी दिली आहे.
सविस्तर वृत्तनिवडणूक प्रचारासाठी वापरल्या जाणार्या फिरत्या वाहनांवर पक्ष प्रचाराचा झेंडा हा वाहनाच्या डाव्या बाजूला विंड स्क्रिन ग्लासच्या पुढे राहणार नाही. प्रचाराच्या फिरत्या वाहनांवर कापडी फलक वाहनचालकांच्या आसनामागे वाहनाच्या डाव्या व उजव्या बाजूने लावण्यात यावा, असे निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहेत.
सविस्तर वृत्तविधानसभा निवडणुकीसाठी विद्यार्थ्यांना मतदान करणं शक्य व्हावं, यासाठी मुंबई विद्यापीठाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मुंबई विद्यापीठाने निवडणुकीच्या काळातील नियोजित परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 19 नोव्हेंबर आणि 20 नोव्हेंबरला ठेवण्यात आलेल्या परीक्षेची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे.
सविस्तर वृत्तमहाविकास आघाडीतील काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये विदर्भातील जागांवरुन मतभेद होते. विदर्भातील काही जागांवर शिवसेना ठाकरे गटाकडून दावा केला जात होता.
सविस्तर वृत्तसूरज चव्हाण हा बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनचा विजेता आला. सूरज चव्हाण विजेता झाल्याने संपूर्ण महाराष्ट्राला आनंद झाला. सूरज चव्हाणने त्याचा साधेपणा, खरा स्वभाव आणि टास्कमध्ये दिलेलं १०० टक्के योगदान यामुळे त्याने बिग बॉसच्या विजेतेपदावर मोहोर उमटवली. सूरजला बिग बॉसमध्ये सहभागी करुन घेण्यास कलर्स मराठीचे प्रोग्रामिंग हेड केदार शिंदेंचंही मोठं योगदान आहे.
सविस्तर वृत्तकसब्यातील काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांच्या हिंदमाता प्रतिष्ठानकडून दिवाळीनिमित्त साबण, उटण्याचे किट घेऊन जाणारा टेम्पो निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने तसेच काही सामाजिक कार्यकर्त्यांनी पकडला. नंतर याची निवडणूक आयोगाने तक्रार दाखल करून रविवारी रात्री उशिरा रविंद्र धंगेकर तसेच त्यांच्या हिंदमाता प्रतिष्ठान विरोधात आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. याप्रकरणी निवडणूक आयोगातील अधिकारी स्वामीनंद पोतदार यांनी समर्थ पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
सविस्तर वृत्तमहाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या विसावा नाका येथील जलवाहिनीची दुरुस्ती अद्याप सुरू असल्याने गेल्या तीन दिवसापासून शाहूनगर परिसरातील नागरिकांना तीव्र पाणीटंचाई सोसावी लागत आहे. प्राधिकरणाच्या या ढिसाळ कारभाराबाबत नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
सविस्तर वृत्तऊसाचा गळीत हंगाम जवळ येऊन ठेपला आहे. या पार्श्वभूमीवर ऊस उत्पादक शेतकर्यांचे कारखान्यांच्या भूमिकेकडे लक्ष लागून राहिले आहे. म्हणूनच शेतकर्यांच्या कष्टाची ऊसाची एकरकमी एफआरपी जमा करा. अन्यथा रयत क्रांती संघटना तीव्र स्वरूपाचे आंदोलन करेल, असा इशारा युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रकाश उर्फ सोनू साबळे यांनी दिला आहे.
सविस्तर वृत्तलाडकी बहीण योजना ही योजना फसवी होती. आर्थिक टंचाईमुळे ही योजना बंद करण्यात आली आहे आणि सत्ताधारी निवडणूक आयोगाने सांगितले म्हणून ही योजना बंद केल्याचे खोटे सांगत आहेत. ही वस्तुस्थिती जनतेला कळली पाहिजे, अशी कडवट टीका आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.
सविस्तर वृत्त