चेहर्यावरचे कावरेबावरे हावभाव, काहींच्या हातामध्ये लहान बाळ, शाळेच्या प्रवेशद्वारावर छोट्या विद्यार्थीनींनी केसात माळायला दिलेले गजरा व विद्यार्थ्यांनी टाळ्या वाजवून केलेले स्वागत यामुळे भारावून गेलेल्या सातारा शहरातील विविध भागातील कचरा वेचक महिला भारावून गेल्या. निमित्त होते सातारा शाहुनगर येथील गुरूकुल स्कूलमधील दीपावलीचे.
सविस्तर वृत्तकराड तासवडे टोल नाक्यावर १५ लाखाची रोकड वाहनातून नेली जात असताना तळबीड पोलिसांनी जप्त केल्याने एकच खळबळ उडाली. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा मोठ्या रकमा वाहनातून नेल्या जात असल्याने पोलीस दल अलर्ट असून जिल्ह्यात विविध ठिकाणी चेक पोस्टवर कसून तपासणी केली जात आहे.
सविस्तर वृत्तआगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने सातारा तालुका पोलीस ठाणे हद्दीमध्ये कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून विविध गावांमध्ये रूट मार्च काढण्यात आला.
सविस्तर वृत्तकेरळ पशुवैद्यकीय विद्यापीठाच्या नेतृत्वाखाली आयोजित ग्लोबल लाइव्हस्टॉक कॉन्क्लेव्हने दुग्धव्यवसाय, पशुधन, आणि कृषि क्षेत्राच्या सर्वसमावेशक विकासासाठी एक नवा अध्याय सुरू केला आहे. कोची येथे झालेल्या या विशेष कार्यक्रमात केरळ युनिव्हर्सिटी ऑफ फिशरीज अँड ओशन स्टडीज (KUFOS) चे कुलगुरू डॉ. प्रदीप कुमार यांच्या हस्ते विद्यापीठाची वेबसाइट लाँच करण्यात आली.
सविस्तर वृत्तसातार्यातील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात 50 किलोवॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित केला जाणार आहे. या कामास लवकरच प्रारंभ होणार असून, प्रकल्पामुळे संग्रहालयाच्या वीजबिलात मासिक सुमारे एक लाख रुपयांची बचतही होणार आहे.
सविस्तर वृत्तसातारा- जावलीतील जनतेने माझ्यावर विश्वास टाकला, आमदारकीची संधी दिली. मतदारसंघाचा चौफेर विकास करून जनतेने दिलेल्या संधीचे मी सोनं केले आहे. सातारा आणि जावलीतील जनतेशी कधीही न तुटणारी नाळ जोडली गेली आहे. जनतेच्या कायम ऋणात राहून मतदारसंघाचा विकास करणे हेच माझे कर्तव्य आहे.
सविस्तर वृत्त20 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रातील सर्व विधानसभा जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. 23 नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहे. 29 ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत.
सविस्तर वृत्तकोल्हापुरात खासगी बसला आग लागल्यानं एका प्रवाशाचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना घडलीय. बेळगाहून पुण्याला जात असताना बसने पेट घेतला. यात एकाचा मृत्यू तर सहा जण जखमी झाल्याची माहिती समजते. बेळगावहून पुण्याला निघालेली खासगी ट्रॅव्हल्सची बस जळून खाक झाली. यामध्ये एका प्रवाशाचा होरपळून मृत्यू झाला.
सविस्तर वृत्तशिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे वडील स्व. अभयसिंहराजे भोसले उर्फ भाऊसाहेब महाराजांनी त्यांच्या उमेदीच्या काळात असंख्य कार्यकर्त्यांना सोबत घेऊन सातारा तालुक्यात सहकारक्रांती घडवली. आज अजिंक्यतारा सहकारी साखर कारखाना व अजिंक्य उद्योग समूहातील विविध संस्थांच्या माध्यमातून स्व. भाऊसाहेब महाराजांचा गट सातारा तालुक्यात आजही शिवेंद्रसिंहराजे यांच्यासोबत सक्षमपणे समाजकारण आणि राजकारणात सक्रिय आहे.
सविस्तर वृत्तपाटण तालुक्यातील सडा दाढोली येथील वयोवद्ध पुरुष व महिलांचा पाटण तालुका प्रशासनाकडून सत्कार करण्यात आला. विधानसभा निवडणूकीत शंभर टक्के मतदान करण्याचे आवाहनही करण्यात आले.
सविस्तर वृत्त