राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. आता माहीम मतदारसंघात तिरंगी लढत होणार असल्याचं जवळपास निश्चित झालं आहे. सदा सरवणकर यांनी अखेर आपला निर्णय जाहीर केला आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी अवघे काही मिनिटं बाकी असताना सदा सरवणकर यांनी आपला निर्णय जाहीर केला आहे.
सविस्तर वृत्तसर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी महाविकास आघाडीने सामूहिकरित्या मला उमेदवारी दिली आहे. सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी मैदानात उतरलो आहे, मात्र माझ्या पक्षांतरावर बोलणारे नैतिकतेची भाषा करतात. त्या अनुषंगाने मात्र त्यांचे पक्षांतर हे ठेकेदारांसाठी आहे का? अशी अप्रत्यक्ष टीका महाविकास आघाडी व मित्र पक्षाचे उमेदवार अमितदादा कदम यांनी कोणाचेही नाव न घेता साताऱ्यात केली.
सविस्तर वृत्तमहाविकास आघाडी व मित्र पक्षाचे सातारा-जावली विधानसभा संघाचे उमेदवार अमितदादा कदम यांच्या सातार्यातील प्रचाराने गती घेतली आहे. शहराच्या पश्चिम भागातून अमितदादा प्रचाराच्या निमित्ताने शहराचा कानाकोपरा ढवळून काढायला सुरुवात केली आहे.
सविस्तर वृत्तजावली तालुक्यातील शेतकर्यांसाठी वरदान ठरलेले महू-हातगेघर 25 वर्षांपूर्वी 90 टक्के पूर्ण झाले होते. मात्र त्यानंतर उरलेले काम सत्ताधार्यांना दिसले नाही का ? विकास म्हणजे ठेकेदारांच्या सोयीची कामे म्हणजे विकास नाही, अशी जळजळीत टीका अमितदादा कदम यांनी महू येथील सभेमध्ये केली.
सविस्तर वृत्तसातारा- जावली मतदारसंघात प्रत्येक गावात, वाडी- वस्तीत विकासाचा झंजावात करून शिवेंद्रसिंहराजेंनी संपूर्ण मतदारसंघाचा कायापालट केला आहे. समाजातील सर्व घटकांचे विविध प्रश्न, समस्या सोडवून त्यांनी प्रत्येक घटकाला, प्रत्येक समाजाला न्याय मिळवून देण्याचे काम केले आहे, असे प्रतिपादन सौ. वेदांतिकाराजे भोसले यांनी केले.
सविस्तर वृत्तदिवाळी सुरू झाली आहे. फटाके हा दिवाळीतला जणू अनन्यसाधारण भाग बनला आहे. पण दुसरीकडे बदलत्या काळाबरोबर प्रदूषणात वाढ होत आहे. त्यात फटाक्यांमुळे होणाऱ्या प्रदूषणाची भर पडत असल्याने त्याचा आरोग्यावर मोठा परिणाम होत आहे.
सविस्तर वृत्तमुंबईत शुक्रवारपासून विविध ठिकाणी आगी लागण्याच्या घटना सुरूच आहेत. शुक्रवारी अंधेरी, सायन येथे आगीच्या घटना घडलेल्या असतांना दुसऱ्या दिवशी अर्थात आज (शनिवार) दुपारच्या सुमारास गोरेगाव (पश्चिम) कल्पतरू रेसिडेन्सी या ३२ मजली इमारतीमध्ये दुसऱ्या मजल्यावर आग लागल्याची घटना घडली.
सविस्तर वृत्तआळंदी-पंढरपूर पालखी महामार्गावर बरड (ता. फलटण) येथील बागेवाडी पेट्रोल पंपाजवळ कंटेनरच्या धडकेत कारमधील तीन जण ठार झाले. सागर रामचंद्र चौरे (वय ३४, रा. पाडेगाव, ता. खंडाळा), भाऊसाहेब आप्पा जमदाडे (वय ४५, रा. खेड बुद्रुक, ता. खंडाळा), नीलेश चंद्रकांत शिर्के (वय ४०, रा. वेटणे, ता. खटाव. मूळ रा. खटाव, ता. खटाव) अशी मृतांची नावे आहेत. काल पहाटे साडेचारच्या सुमारास हा अपघात झाला.
सविस्तर वृत्तमहेश शिंदे यांच्या प्रचारार्थ खेड येथून युवक तसेच शिवसेना पदाधिकाऱ्यांनी भव्य बाईक रॅली काढली.
सविस्तर वृत्तमहाविकास आघाडीचे सातारा विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार अमितदादा कदम यांनी प्रचाराचा शुभारंभ केला असून सातार्यात त्यांचे प्रचार दौरे गतिमान झाले आहेत. बुधवारी सातारा पालिकेचे माजी नगरसेवक व सभापती वसंत लेवे यांच्या वाढदिवसानिमित्त अमितदादा कदम यांनी उपस्थिती दर्शवून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या उपस्थितीची राजकीय वर्तुळामध्ये चांगलीच चर्चा रंगली होती.
सविस्तर वृत्त