या महिन्याच्या सुरुवातीला अदानी समूहाने नवी मुंबईच्या धावपट्टीवर भारतीय हवाई दलाच्या विमानांचे यशस्वीरित्या लँडिंग केले होते. सिंग यांनी अदानी फ्लॅगशिप कंपनीच्या तिमाही आणि सहामाही निकालांची घोषणा करताना सांगितले की, ते पुढील वर्षी, 2025 च्या पहिल्या सहामाहीत विमानतळाचे ऑपरेशन सुरू करण्याच्या मार्गावर आहेत.
सविस्तर वृत्तदिवाळी व इतर सणाचे वेळी मोठया आवाजाचे फटाके उडविण्यामुळे निर्माण होणा-या ध्वनी व हवा प्रदुषणाचे जनतेवर होणारे संभाव्य अपायकारक परिणाम टाळण्यासाठी असे फटाके वाजविण्यावर निर्बंध घालणेबाबत आदेश दिलेले आहेत. तसेच पर्यावरण (संरक्षण) कायदा 1986 अंतर्गत पर्यावरण (संरक्षण) नियम व सुधारीत नियम 89 जे फटाक्याच्या आवाजाच्या मानांकनाबाबत आहेत त्यांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याबाबतचे आदेश देण्यात आलेले आहेत.
सविस्तर वृत्तसातारा प्रादेशिक परिवहन विभागाने खासगी ट्रॅव्हल्सची तपासणी मोहीम हाती घेतली आहे. दोन दिवसांत सुमारे 213 ट्रॅव्हल्सची झाडाझडती घेण्यात आली. त्यामध्ये 71 ट्रॅव्हल्सने नियमभंग केल्याचे आढळून आले. त्यामुळे त्यांना 1 लाख 59 हजार 500 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.
सविस्तर वृत्तविधानसभा निवडणुकीसाठी मंगळवारी (दि.२९) अर्ज भरणाच्या शेवटच्या दिवशी महायुती तसेच महाविकास आघाडीतील बंडखोरांनी अपक्ष नामनिर्देशनपत्र सादर केले. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांपुढे पेच निर्माण झाला असून, प्रमुख उमेदवारांमध्ये धडकी भरली आहे.
सविस्तर वृत्तसातारा जिल्हयाची अर्थवाहिनी, सर्वसामान्यांची बँक असा नावलौकीक असलेल्या जनता सहकारी बँक लि.,सातारा,चे भागधारक पॅनेलप्रमुख बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे चेअरमन, जेष्ठ संचालक विनोद कुलकर्णी यांची महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळावर सदस्य म्हणून निवड झाल्याबद्दल बँकेचे चेअरमन अमोल मोहिते यांनी बँकेच्यावतीने पेढे, शाल व पुष्पगुच्छ देवून यथोचीत सत्कार केला.
सविस्तर वृत्तमहायुतीमध्ये अजूनही काही जागांवरील तिढा सुटलेला नाही. मात्र ज्या जागांवर योग्य तोडगा निघतोय, त्या-त्या जागांचे उमेदवार महायुतीकडून जाहीर केले जात आहेत. नुकतेच भाजपाने (BJP) आपल्या उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली आहे. या यादीत एकूण दोन जागांसाठी उमेदवार देण्यात आले आहेत.
सविस्तर वृत्तशायना एनसी या केवळ शिंदे गटाच्या उमेदवारच नाही तर महाराष्ट्रातील प्रसिद्ध फॅशन डिझायनरही आहेत. शायना मुस्लिम कुटुंबातून आल्या आहे. 18 वर्षांच्या असताना त्यांनी फॅशन डिझाईन करायला सुरुवात केली.
सविस्तर वृत्तराज्यातील विधानसभा निवडणुकीच्या राजकारणात गेल्या दोन दिवसांपासून एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटातील आमदार श्रीनिवास वनगा यांची चर्चा होत आहे. श्रीनिवास वनगा सोमवारी संध्याकाळी सात वाजेपासून बेपत्ता आहे. घरातून एका पिशीवीत काही कपडे घेऊन ते गेले अन् नॉट रिचेबल झाले आहे. जाण्यापूर्वी त्यांनी माध्यमांकडे मन मोकळे केले.
सविस्तर वृत्तमहाविकास आघाडीच्या अखेरच्या टप्प्यात वाटाघाटीतून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून, मशाल चिन्ह घेऊन साताऱ्याच्या राजकीय रिंगणात उतरलेल्या अमितदादा कदम यांनी आपल्या समर्थकांसह कोणतेही शक्ती प्रदर्शन न करता अत्यंत साधेपणाने अर्ज दाखल केला. दुपारी एक वाजता निवडणूक निर्णय अधिकारी प्रांत सुधाकर भोसले व तहसीलदार नागेश गायकवाड यांच्याकडे हा अर्ज दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्तदोन्ही बाबांनी पैसा कमावण्याचा उद्योग सुरू केल्याची जाण आणि भान सर्वसामान्य कुटुंबाला झालेली आहे आणि मला खात्री आहे, आजपासून दोन्ही बाबा एका गॅसवर बसलेले असणार आहेत, असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे कराड दक्षिण चे उमेदवार संजय गाडे यांनी केले.
सविस्तर वृत्त