दहिवडी (ता.माण) येथून माण - खटाव विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून जयकुमार गोरे यांनी अर्ज दाखल केला. यावेळी भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी, आर.पी.आयचे दोन्ही गट, रयत क्रांती संघटना, जनसुराज्य शक्ती, जय मल्हार क्रांती संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
सविस्तर वृत्तकृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष ना.महेश शिंदे यांनी शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी कॉंग्रेस(अजित पवार गट), रिपब्लिकन पार्टी, पीपल्स रिपब्लिकन पार्टी महायुतीच्या माध्यमातून सोमवारी जोरदार शक्तिप्रदर्शन करत, रॅली काढून उमेदवारी अर्ज दाखल केला.
सविस्तर वृत्तकराड दक्षिणसाठी आतापर्यंत एकूण दहा अर्ज दाखल झाले आहेत. मात्र, या ठिकाणी दोन विचारांची लढाई आहे. पश्चिम महाराष्ट्रात प्रामुख्याने कराडमध्ये जातीयवादी प्रवृत्तीचा प्रवेश होऊ द्यायचा नाही, यासाठीचे प्रयत्न आहेत. येथील जनता सुज्ञ असून ती महाविकास आघाडीला बहुमत देईल, असा विश्वास आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला.
सविस्तर वृत्तकराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार माजी मंत्री आ. बाळासाहेब पाटील यांनी मोठे शक्तीप्रदर्शन करत सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. प्रीतिसंगमावरील यशवंतरावांच्या समाधीस्थळी, तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळयाला अभिवादन केले. त्यानंतर आ. बाळासाहेब पाटील यांच्या निवासस्थानापासून दत्त चौकापर्यंत समर्थकांनी मोठे शक्तीप्रदर्शन करत भव्य रॅली काढली.
सविस्तर वृत्तकराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार मनोज घोरपडे यांनी मोठे शक्तीप्रदर्शन करत सोमवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. प्रारंभी, त्यांनी प्रीतिसंगमावरील यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी अभिवादन केले.
सविस्तर वृत्तमहायुतीचे सातारा जावली विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सातार्यात सोमवारी विराट शक्ती प्रदर्शन करत दुपारी दोन वाजता आपला उमेदवारी अर्ज भरला. यावेळी खासदार उदयराजे भोसले तसेच बाबाराजे समर्थकांसह निवडक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. आरंभ ही प्रचंड है, बाबाराजे तुम आगे बढो अशा घोषणाबाजींनी राजवाडा परिसर दणाणला.
सविस्तर वृत्तलष्कारातील उत्पादने ‘मेड इन इंडिया’ करण्याचे धोरण मोदी सरकारने आखले आहे. यामुळे भारतीय लष्कारातील उत्पादने खासगी कंपन्याही आता विकसित करु लागल्या आहेत. देशातील सर्वात विश्वासार्ह ब्रँड म्हणून ओळख असलेल्या टाटा समूह हवाईदलासाठी विमाने बनवणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सांचेज सोमवारी टाटा एअरक्रॉप्ट कॉम्प्लेक्सचे उद्घाटन करत आहेत.
सविस्तर वृत्तदरवर्षी दिवाळीच्या मुहूर्तावर 'रन फॉर हेल्थ व रन फॉर ऑल" हे ब्रीदवाक्य घेवून आयोजित होत असलेली निमा रन 2024 ची तिसरी आवृत्ती साताऱ्यात पार पडली. यामधे साताऱ्यासह महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातून 1100 धावपटू 10 व 3 किलोमीटर अंतराच्या स्पर्धेत सहभागी झाले होते.
सविस्तर वृत्तदीपोत्सवाचा सर्वत्र माहोल तयार झाला असून, अवधं जनजीवन उत्साहाने न्हाऊन गेले आहे. खरेदीसाठी नागरिकांची गदीं होत असून, बाजारपेठा तुटुंब झाल्या आहेत.
सविस्तर वृत्तभारतीय उद्योग विश्वातील लिजेंड असणारे रतन टाटा यांचे मुंबईत 9 ऑक्टोंबर रोजी निधन झाले. त्यानंतर त्यांचे मृत्यूपत्र समोर आले. त्यात त्यांनी घरातील कर्मचाऱ्यापासून आपल्या आवडत्या श्वानासाठी तरतूद करुन ठेवली होती. भारतातील अनेक क्षेत्रात टाटा समूहाचे सामाजिक कार्य सुरु असते. त्यामुळेच टाटा हे नाव भारतीयांच्या मनमानात बसले आहे. आता रतन टाटा यांचा सन्मान ब्रिटनमधील ऑक्सफोर्ड विद्यापीठाने करण्याचा निर्णय घेतला आहे.
सविस्तर वृत्त