ईक्षण संकेत शानभागने MRF mogrip नॅशनल supercross चॅम्पियनशिप राऊंड 4 मध्ये प्रथम क्रमांक पटकावला
येथील १६ वर्षाच्या ईक्षण संकेत शानभाग याने पुणे येथे झालेल्या MRF mogrip नॅशनल supercross चॅम्पियनशिप राऊंड 4 मध्ये प्रथम क्रमांक पटकावला व त्याने सर्वोत्कृष्ट रायडर ट्रॉफी देखील जिंकली.
सातारा : येथील १६ वर्षाच्या ईक्षण संकेत शानभाग याने पुणे येथे झालेल्या MRF mogrip नॅशनल supercross चॅम्पियनशिप राऊंड 4 मध्ये प्रथम क्रमांक पटकावला व त्याने सर्वोत्कृष्ट रायडर ट्रॉफी देखील जिंकली. Supercross रेस ही भारतातील सर्वोत्तम स्पर्धा आहे.
ईक्षण याची क्रीडा क्षेत्रातील कामगिरी बरोबरच शैक्षणिक कामगिरीही वाखानण्याजोगी आहे. तो अभ्यासात ही हुशार आहे. त्याला अभ्यासासाठी सर्व शिक्षक वैयक्तिक मार्गदर्शन करतात. त्यामुळे तो क्रीडा आणि शैक्षणिक क्षेत्र या दोन्हीमध्ये योग्य पद्धतीने संतुलन राखतो. ईक्षण हा TVS चा रायडर आहे. ईक्षण हा TVS RTR 300 ही मोटर सायकल चालवतो.
ईक्षण हा के.एस.डी.शानभाग विद्यालय व ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स येथे इयत्ता बारावी( वाणिज्य) मध्ये शिक्षण घेत आहे. त्याच्या यशाबद्दल विद्यालयाचे संस्थापक व ज्येष्ठ क्रीडा मार्गदर्शक आणि त्याचे आजोबा श्री रमेश शानभाग, विश्वस्त सौ. उषा शानभाग, संचालिका आंचल घोरपडे, मुख्याध्यापिका रेखा गायकवाड, मुख्याध्यापक भाग्येश कुलकर्णी तसेच विद्यालयाचे क्रीडा विभाग प्रमुख अभिजीत मगर यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, पालक व पालक प्रतिनिधी यांनी त्याचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.