जिल्ह्याच्या पश्चिम भागात मुसळधार पाऊस सुरू असल्याने कोयना धरणाच्या पाणीसाठ्याने १०० टीएमसीकडे वाटचाल सुरू केली आहे.
गुरुकुल स्कूलचा माजी विद्यार्थी चि. पियुष अरुण जाधव हा अमेरिकेतील केलीफोर्नियाच्या स्टेट युनिवर्सिटी मध्ये एम. एस. (कॉम्पुटर सायन्स) सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगचे द्वितीय वर्षात उच्च शिक्षण घेत आहे.
सातारा नगरपालिकेच्या निवडणूकीच्या अनुषंगाने निवडणूक आयोगाच्या दिलेल्या सुचनेनुसार निवडणूक विभागाने प्रभाग रचना निश्चित करण्यासाठी नकाशे नागरिकांना पाहण्यासाठी नगरपालिका सभागृह येथे लावण्यात आले आहेत.
राष्ट्रसंत श्री समर्थ रामदास स्वामींच्या वास्तव्याने पुनित झालेल्या आणि रामदास स्वामींची समाधी असलेल्या सज्जनगड तीर्थक्षेत्रावरील श्री समर्थ सेवा मंडळ यांच्या वतीने रविवारी सकाळी सज्जनगड रन 2025 चे आयोजन करण्यात आले होते.
खंडाळा- शिरोळ या मार्गाचा भाग असलेल्या पिंपोडे खुर्द ते कोरेगाव या रस्त्याच्या कामामुळे निर्माण झालेल्या समस्यांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी काल स्वातंत्र्यदिनी एकत्र येत सातारा-लोणंद मार्गावर पिंपोडे खुर्द (ता. कोरेगाव) येथे रास्ता रोको आंदोलन केले.
सातारा शहरातील महामार्गालगत 'वास्तू प्लाझा' या इमारतीमध्ये बंद फ्लॅट फोडणार्या पुणे जिल्ह्यातील तिघांच्या टोळीतील एक चोरटा इमारतीवरुन पडून ठार झाला.
जिल्ह्यातील सहकारी संस्थांची मातृसंस्था, आपल्या उत्तम प्रशासन, उत्कृष्ठ कार्यपध्दती व सुयोग्य नियोजनामुळे राज्यातच नव्हेतर देशात सहकार क्षेत्रातील बँकिंगमध्ये सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने चांगली प्रगती केलेली असून या बँकेची 75 वी वार्षिक साधारण सभा शनिवार दि. 16 रोजी खेळीमेळीच्या व उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली.
वाई पोलीस उपविभागाचे उपअधीक्षक बाळासाहेब भालचीम यांना प्रशंसनीय सेवेबद्दल राष्ट्रपती पदक मिळाले आहे, तसेच जिल्ह्यातील दोन पोलिसांना पोलिस महासंचालक विशेष सेवा पदक मिळाले आहे.
जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयाचे नुतनीकरण करुन त्या ठिकाणी पालकमंत्री कार्यालय सुरु करण्यात आले आहे.
राजधानी साताऱ्यात तब्बल ३२ वर्षानंतर ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे. मसाप शाहूपुरी शाखा, मावळा फौंडेशनच्या वतीने हे संमेलन होणार असून त्याची जोरदार तयारी सुरु आहे.