अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याप्रकरणी अज्ञातावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शस्त्रबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोघांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
विवाहितेचा जाचहाट केल्याप्रकरणी पाच जणांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सातारा शहर परिसरातून अज्ञात चोरट्यांनी दोन दुचाकींच्या चोऱ्या केल्याच्या नोंदी संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये दाखल करण्यात आल्या आहेत.
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी तीन जणांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अपघातात एकास जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
राहत्या घरातून एकजण बेपत्ता झाल्याची नोंद शाहूपुरी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
हद्दपार आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी आठ जणांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फलटण तालुक्यातील निंभोरे येथील ग्रामपंचायत वहिवाटीचा रस्ता अडवण्यात आला असून त्यांच्यावर कारवाई करावी, या मागणीसाठी सातारा जिल्हा परिषद कार्यालयासमोर कांबळे कुटुंबियांनी बेमुदत उपोषण सुरु केले आहे. दरम्यान, जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाला कुटुंबियांनी निवेदन दिले.
महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना मागील अनेक वर्षापासून जुनी पेन्शन मागणीसाठी लढा देत आहे. संघटनेच्या विविध आंदोलनात लाखो कर्मचारी उपस्थितीत राहून जुन्या पेन्शनसाठी आपला असंतोष व्यक्त करीत असताना सरकार कोणतेही असले तरी वेळोवेळी मात्र शासनाने फक्त आश्वासन देऊन कर्मचाऱ्यांच्या माथी फसव्या एनपीएस, जीपीएस, युपीएस या योजना मारण्याचा प्रयत्न केला आहे.