शस्त्रबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा
शस्त्रबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोघांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
सातारा : शस्त्रबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोघांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 12 रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास इंदिरानगर, विलासपूर येथील एका गणपती मंडळासमोर शस्त्र बंदी आदेश असताना देखील हातात लोखंडी कोयता घेऊन लोकांमध्ये दहशत निर्माण केल्याप्रकरणी आकाश नेटके व मयूर नेटके (पूर्ण नाव माहित नाही) रा. मल्हार पेठ, सातारा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक फौजदार दिघे करीत आहेत.