सातारा शहरातून दोन दुचाकींची चोरी
सातारा शहर परिसरातून अज्ञात चोरट्यांनी दोन दुचाकींच्या चोऱ्या केल्याच्या नोंदी संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये दाखल करण्यात आल्या आहेत.
सातारा : सातारा शहर परिसरातून अज्ञात चोरट्यांनी दोन दुचाकींच्या चोऱ्या केल्याच्या नोंदी संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये दाखल करण्यात आल्या आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 31 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर दरम्यान शंतनू शरदराव देशमुख रा. रविवार पेठ सातारा यांची हिरो होंडा स्प्लेंडर दुचाकी क्र. एमएच 10 बीटी 1303 अज्ञात चोरट्याने राधिका रस्त्यावरील ॲक्सिस बँकेच्या समोरून चोरून नेली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार मोहिते करीत आहेत.
दुसऱ्या घटनेत महेश सुनील कुऱ्हाडे रा. अमरलक्ष्मी चौक, कोडोली, सातारा यांची घरासमोर पार्क केलेली मोटरसायकल क्र. एमएच 11 डीएम 8949 अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार भिसे करीत आहेत.