विवाहितेचा जाचहाट केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा
विवाहितेचा जाचहाट केल्याप्रकरणी पाच जणांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सातारा : विवाहितेचा जाचहाट केल्याप्रकरणी पाच जणांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 21 एप्रिल 2024 ते 13 सप्टेंबर दरम्यान चारुशीला विकी सरनाईक सध्या रा. कोडोली, सातारा या विवाहितेस जाचहाट केल्याप्रकरणी पती विकी राजेंद्र सरनाईक, नूतन राजेंद्र सरनाईक, राजेंद्र बळवंत सरनाईक, करण राजेंद्र सरनाईक, नणंद पूजा राहुल कांबळे सर्व राहणार क्रांतिसिंह नाना पाटील नगर, कोल्हापूर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास महिला पोलीस हवालदार सूर्यवंशी करीत आहेत.