अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा
अपघातात एकास जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
सातारा : अपघातात एकास जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 10 रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास वसंत मानसिंग आवळे रा. मालगाव, ता. सातारा हे घरासमोर शतपावली करत असताना तेथीलच अभिषेक उपोषण भोसले याने त्याच्या ताब्यातील दुचाकी क्र. एमएच 11 बीडब्ल्यू 1613 भरधाव वेगात, बेदरकारपणे चालवून आवळे यांना जोराची धडक दिली. या अपघातात आवळे जखमी झाले असून याबाबतचा गुन्हा सातारा तालुका पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस नाईक मोरे करीत आहेत.