आषाढ महिन्यातील बैल बेंदूर सणा निमित्त सातारा शहरातील यादोगोपाळ पेठेतील माने परिवाराने आपल्या लाडक्या सर्जा राजांची अशी भव्य मिरवणूक निघाली.
सविस्तर वृत्तकोयना धरणांतर्गत कोयना, नवजा, महाबळेश्वर या तिन्ही ठिकाणी पावसाचा जोर कायम आहे. धरणांतर्गत विभागातील छोट्या नद्या, नाले, ओढे, धबधबे यातून सध्या सरासरी प्रतिसेकंद 19,181 क्युसेक पाण्याची आवक होत असल्याने पाणीसाठ्यात वाढ होत आहे.
सविस्तर वृत्तराज्य लोकसेवा आयोग परीक्षेच्या नुकत्याच लागलेल्या निकालात म्हसवड येथील सुरभी सविता नितीनकुमार तिवाटणे हिने बाजी मारली.
सविस्तर वृत्तमळेवाड-कोंडुरे देऊळवाडी येथे रविवारी चौघा ग्रामस्थांवर हल्ला करून गंभीर जखमी करणाऱ्या बिबट्याला मंगळवारी पहाटे सातारा येथे हलविण्यात आले.
सविस्तर वृत्तसातारा शहरातील मध्यवर्ती बस स्थानक आणि मध्यवर्ती कार्यशाळा यांची आधुनिक स्वरूपात पुनर्बांधणी करावी, अशी मागणी आम्ही केली होती. या मागणीनुसार दोन्ही कामांना शासनस्तरावरून मंजुरी मिळालेली असून, निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे.
सविस्तर वृत्तराज्यातील गटसचिव कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन मिळावे, यासाठी महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळी विदर्भ, मराठवाड्यातील गटसचिवांनी धरणे आंदोलन सुरू केले आहे.
सविस्तर वृत्तस्वच्छ भारत मिशनच्या दुसर्या टप्प्यांतर्गत केंद्र शासनाने ‘स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण 2025’ ही देशव्यापी पडताळणी मोहीम हाती घेतली आहे.
सविस्तर वृत्तप्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी मंगळवारी आशा सेविकांनी आंदोलन केले. आंदोलनावेळी मागण्यांबाबतचे निवेदन आंदोलकांनी जिल्हा परिषद प्रशासनास दिले.
सविस्तर वृत्तमाजी केंद्रीय मंत्री स्व.आनंदराव चव्हाण व माजी खा. स्व.प्रेमलाताई चव्हाण (काकी) या राजकारणातील आदर्श दाम्पत्य होते. दोघांचा स्मृती दिन 8 जुलै रोजी एकाच दिवशी असतो.
सविस्तर वृत्तअहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडियाच्या विमान अपघाताची चौकशी करणाऱ्या पथकाने आपला प्राथमिक अहवाल नागरी उड्डाण मंत्रालयाला सादर केला आहे.
सविस्तर वृत्त