माणच्या पश्चिमेकडील तेलदर्यासह अनेक गावात बुधवारी पहाटे दोन तास ढग फुटीसद़ृश पाऊस झाला. या पावसाचे पाणी आंधळी नदीपात्रात आल्याने माणगंगा नदीला पूर आला. दहिवडी परिसरात पावसाचा थेंबही न पडता बुधवारी दहिवडी-जुना फलटण रस्ता पाण्याखाली गेला. पाऊस न पडता चार ठिकाणी पूल पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प झाली. गेले काही दिवस हवेत उष्मा निर्माण होत आहे.
सविस्तर वृत्तवाई तालुक्यात या वर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडल्याने त्याचा रब्बी हंगामातील पेरणीवर विपरीत परिणाम झालेला आहे. सध्या रब्बीच्या पेरण्या सुरू आहेत. मात्र, परतीच्या पावसामुळे ज्वारी, गहू, हरभरा व इतर पिकांच्या पेरणी कामात अडचणी निर्माण झाल्या आहेत. सद्यः स्थितीत तालुक्यात 50 टक्के पिकांचा पेरा झाला आहे.
सविस्तर वृत्तविधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. अनेक बडे नेते आपला अर्ज दाखल करत आहेत. हा अर्ज भरताना हे उमेदवार मोठे शक्तिप्रदर्शन करत आहेत. दरम्यान, एकीकडे अर्ज भरण्यााची लगबग चालू असताना दुसरीकडे हे नेते प्रचारासाठी खास रणनीती आखत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवारही यात मागे नाहीत. त्यांनी लाडकी बहीण योजनेचा आधार घेत महाराष्ट्रातील महिला मतदार तसेच पुरुष मतदारांना आकर्षित करण्यासाठी खास शक्कल लढवली आहे.
सविस्तर वृत्तमहायुती सरकारने लोकहिताचे निर्णय वेळोवेळी घेऊन आपली उपयुक्तता सिद्ध केली आहे. विरोधकांना बोलायला जागा नसल्यामुळे केवळ अफवा म्हणून वेगवेगळ्या योजनांवर टीका केली जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या माध्यमातून राज्याची चौफेर प्रगती सुरू आहे. मुख्यमंत्र्यांनी दिवाळीनंतर लाडकी बहीण योजनेची ओवाळणी वाढवण्याची घोषणा यापूर्वीच केली आहे.
सविस्तर वृत्तबँकिंग फ्रंटिअर्स ही एक राष्ट्रीय स्तरावरील अग्रणी मल्टी प्लॅट फॉर्म मीडिया कंपनी आहे. त्यांचे माध्यमातून बँकिंग क्षेत्रामध्ये कामकाज करीत असलेल्या संस्थांनी केलेल्या उल्लेखनिय कामकाजाची दखल घेवून त्या संस्थांचा पुरस्कार देवून गौरव केला जातो. तसेच बँकिंग क्षेत्रामध्ये होत असलेले विविध तांत्रिक बदल व चालू घडामोडींचा आढावा घेवून बँकिंग फ्रंटिअर्स मासिकांचे माध्यमातून माहिती बँकांपर्यंत पोहोचविणेचे उल्लेखनिय कामकाज करते.
सविस्तर वृत्तपुरुषोत्तम जाधव यांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर दोन तालुक्यांच्या नात्यांची बेरीज केली आहे. त्यांचे सुपुत्र शुभंकर व महाबळेश्वरच्या कोंढाळकर घराण्यातील सायली लवकरच लग्न बंधनात अडकणार आहेत. कै. ह. भ .प. बाजीराव आनंदराव जाधव यांचे नातू व पुरुषोत्तम बाजीराव जाधव यांचे चिरंजीव चि.शुभकंर पुरूषोत्तम जाधव रा. अतिट ता .खंडाळा जि.सातारा आणि महाबळेश्वरचे माजी उपनगराध्यक्ष हे मूळचे वाई तालुक्यातील पश्चिम भागातील बोरगाव येथील आहेत लक्ष्मण कोंढाळकर यांची नात व बाळकृष्ण कोंढाळकर यांची कन्या सायली यांचा महाबळेश्वर येथे आज कुंकुम तिलक सोहळा नुकताच पार पडला. या सोहळ्यामुळे खंडाळा तालुका आणि वाई महाबळेश्वर तालुक्याचे नाते दृढ झाले आहे.
सविस्तर वृत्तमाण-खटाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार जयकुमार गोरे गेल्या तीन टर्म पासून आमदार आहेत. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत विजयी चौकार मारण्याच्या प्रतीक्षेत ते आहेत. विधानसभा मतदारसंघात व्यक्तिगत संपर्क, विकासकामांची तगडी जंत्री याच्या जोरावर आमदार जयकुमार गोरे चौथ्यांदा आमदारकी मिळवणार का ?
सविस्तर वृत्तविधानसभा निवडणूक २०२४ अंतर्गत भारत निवडणूक आयोग नवी दिल्ली यांचेमार्फत सातारा जिल्हयातील २६२- सातारा, २५९ कराड उत्तर, २६०- कराड दक्षिण व २६१ पाटण या विधानसभा मतदारसंघासाठी खर्च विषयक निरिक्षक म्हणून श्री. पी सेंथील (आर २७३८५) यांची नियुक्ती करणेत आलेली असुन ते दिनांक २२.१०.२०२४ रोजी साताऱ्यात दाखल झाले आहे. त्यांचे निवासाचे ठिकाण सातारा येथील नवीन विश्रामगृह इमारत पहिला मजला सुट नं. २ या ठिकाणी आहे. त्यांचे संपर्काची माहिती खालीलप्रमाणे :
सविस्तर वृत्तविधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर निवडणूक प्रक्रिया शांततापूर्ण वातावरणात होण्यासाठी कराड उत्तर आणि दक्षिण मतदारसंघात आजपासून मतदार संघाच्या हद्दीसह अनेक ठिकाणी स्थिरपथके तैनात करण्यात आली आहेत.
सविस्तर वृत्तकाँग्रेस आणि उद्धवसेनेतील वाद शमल्यानंतर मंगळवारी सुरू झालेल्या महाविकास आघाडीच्या चर्चेचे गुऱ्हाळ रात्री उशीरापर्यंत सुरू होते. रात्री उशीरा ठरल्यानुसार काँग्रेस आणि उद्धवसेनेतील जागा वाटपावर मार्ग काढण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. ठरलेल्या फॉर्म्युल्यानुसार काँग्रेस सर्वाधिक १०५ च्या घरात जागा लढणार आहे, त्याखालोखाल उद्धवसेना ९५ च्या घरात आणि शरद पवार गट ८४ च्या घरात जागा लढवणार असून उरलेल्या जागा लहान मित्र पक्षांना सोडण्यात आल्याचे मविआतील सूत्रांनी सांगितले.
सविस्तर वृत्त