सातारा शहरासह जिल्ह्यात शुक्रवारी दुपारी पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले. बाजारपेठेत दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर उघड्यावर साहित्य विक्रीस बसलेल्या छोट्या व्यावसायिकांसह व्यापार्यांची तारांबळ उडाली.
अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याच्या जडणघडणीत कामगार- कर्मचाऱ्यांचे नेहमीच मोलाचे योगदान राहिले आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळी सणानिमित्त कारखान्याच्या कामगार- कर्मचाऱ्यांना १९ टक्के बोनस देण्यात येत असून यानिमित्ताने कामगार- कर्मचाऱ्यांची दिवाळी खऱ्या अर्थाने गोड झाली आहे, असे प्रतिपादन कारखान्याचे मार्गदर्शक संचालक आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दरे, ता. महाबळेश्वर गावी एक दिवसाच्या दौर्याकरता आले होते. दरम्यान हेलिकॉप्टरने मुंबईकडे रवाना होत असताना खराब हवामानामुळे हेलिकॉप्टर पुन्हा दरे गावातील हेलिपॅड वर उतरवण्याची वेळ आली. मात्र तातडीच्या कामासाठी मुख्यमंत्री शिंदे मोटारीने मुंबईला रवाना झाल्याची माहिती मिळत आहे.
भाजपचे केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक एका कार्यक्रमासाठी सातारा येथे आले असताना त्यांनी भारतीय जनता पार्टी सातारा जिल्हा कार्यालयास भेट दिली.
मोती चौकातून अज्ञात चोरट्याने सोन्याच्या दागिन्यांसह इतर चीज वस्तू असलेल्या पिशवीची चोरी केल्याची फिर्याद शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
चेष्टा-मस्करीच्या कारणातून युवकांच्या गटात मारामारी झाली. याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हे दाखल झाले आहेत. दरम्यान, ही घटना कास रस्त्यावरील यवतेश्वर गावच्या हद्दीतील हॉटेल डायमंड पाठीमागे घडली आहे.
जुगार प्रकरणी दोनजणांवर सातारा तालुका पोलिसांनी कारवाई केली आहे.
अस्तित्व लपवल्याप्रकरणी एकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बेकायदा दारु विक्री प्रकरणी सातारा शहर पोलिसांनी एकावर कारवाई केली आहे.
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक, २०२४ च्या अनुषंगाने २६२- सातारा विधानसभा मतदार संघामधील आदर्श आचारसंहिता अंमलबजाणीसाठी निवडणुकीसाठी तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती प्रांताधिकारी सुधाकर भोसले यांनी दिली आहे.