राष्ट्रवादी काँग्रेस आणि घड्याळ चिन्हाचा वाद अद्याप सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे. याबाबत आज कोर्टात सुनावणी घेण्यात आली. मागील सुनावणीवेळी सुप्रीम कोर्टाने अजित पवार गटाला ३६ तासांत वृत्तपत्रांमध्ये विशेषत: मराठी वृत्तपत्रात एक डिस्क्लेमर जारी करण्याचे आदेश दिले होते.
सविस्तर वृत्तकराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रीय कॉंग्रेस व महाविकास आघाडी मित्रपक्षाचे अधिकृत उमेदवार आ. पृथ्वीराज चव्हाण यांना संतभूमी संरक्षक संघर्ष समितीने जाहीर पाठिंबा दिला आहे. श्री क्षेत्र देहू येथील तपोभूमीतील या समितीचे संस्थापक तुकोबाभक्त मधुसूदन पाटील व त्यांच्या शिष्टमंडळाने आ. चव्हाण यांच्या निवासस्थानी भेट देवून आपला पाठिंबा जाहीर केला.
सविस्तर वृत्तमहाराष्ट्राला देशातील पहिल्या क्रमांकाचे विकसित राज्य बनविण्याचा भारतीय जनता पार्टीचा संकल्प असून राज्याची अर्थव्यवस्था 1 ट्रिलीयन डॉलर्सपर्यंत पोहोचविण्यासाठी गतिमान विकास हे भाजपाचे ध्येय आहे, असे भाजपाचे धैर्यशीलदादा कदम यांनी आज स्पष्ट केले.
सविस्तर वृत्तबॅंका, दूध संघ, कुकूटपालन, बझार अशा एकामागोमाग एक संस्था यांच्या नाकर्तेपणामुळे मोडीत निघाल्या. विकासाचे नुसते फुगवलेले आकडे सांगणाऱ्यांनी किती युवकांना रोजगार उपलब्ध करून दिला, किती शैक्षणिक संस्था, मोठी उद्योग, साताऱ्यात आणले याचे उत्तर द्यावे, असा सवाल सातारा- जावळी विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार अमितदादा कदम यांनी सातारा शहरातील विविध ठिकाणच्या पदयात्रे दरम्यान बोलताना केला.
सविस्तर वृत्ततुम्ही राज्याचे उपमुख्यमंत्री, पालकमंत्री असताना भोरला निधी देताना आखडता हात ठेवून निवडणुकीवेळी आमच्या बारामतीसारखा विकास पाहा, अशी वल्गना करून जनतेची दिशाभूल करण्याचे काम करीत आहात.
सविस्तर वृत्तकाही लोकांना निवडणूक आली की, मतदारसंघातील जनतेची आठवण होते. खोटा कळवळा आणून हे लोक वाट्टेल तशा तोंडाच्या वाफा फेकत असतात. काहीही झालं तरी मतदारसंघातील जनता विरोधकांच्या भूलथापांना भुलणार नाही.
सविस्तर वृत्तआ. शिवेंद्रराजे भोसले यांच्या माध्यमातून परळी भागात विकासकामांचा डोंगर ऊभा राहिला आहे. परळी भागाचा कायापालट करणाऱ्या आ. शिवेंद्रराजेंनी सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचे काम केले आहे.
सविस्तर वृत्तयंदा निवडणूक आचारसंहितेमुळे कार्तिकी एकादशीची शासकीय महापूजा पुणे विभागाचे महसूल आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या हस्ते सपत्नीक संपत्र झाली.
सविस्तर वृत्तबाळासाहेबांचे विचारधारा सोडणारे काँग्रेस बरोबर गेले. भाजप शिवसेना नैसर्गिक युती त्यांनी तोडली. त्यामुळेच शिवसेना वाचविण्यासाठी सत्तेच्या विरोधात जाऊन जनतेच्या मनातले सरकार आम्ही आणले असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
सविस्तर वृत्तचाळीस गद्दारांच्या जाण्याने शिवसेनेला फरक पडला नाही, तर काल-परवा एखाद्या दुसर्या कार्यकर्त्याच्या जाण्याने काही फरक पडत नाही. शिवसेना गद्दारांना कधी भीक घालत नाही, असा घणाघात शिवसेनेच्या उपनेत्या छायाताई शिंदे यांनी केला.
सविस्तर वृत्त