सातारा येथील एका धाडसी पत्रकाराने आत्महत्या करणार्याचे प्राण वाचविले आहेत. त्यांच्या या धाडसी कृत्यामुळे परिसरातील नागरिकांमधून त्यांचे कौतुक होत आहे.
सविस्तर वृत्तसातारा जिल्हयात शैक्षणिक-सामाजिक कार्यात अग्रेसर असणार्या श्री जानाई मळाई शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष निर्मलसिंग जागिरसिंग बन्सल यांचे अल्पश: आजाराने दुख:द निधन झाले. मृत्यु समयी ते 63 वर्षे वयाचे होते.
सविस्तर वृत्तअनुसुचित जाती व नवबौध्द घटकांसाठी कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेंतर्गत दारिद्रय रेषेखालील भूमीहिन कुटुंबांना चार एक जिरायती (कोरडवाहू) जमीन किंवा दोन एकर बागायती (ओलिताखालील) जमिन उपलब्ध करुन देण्यात येते.
सविस्तर वृत्तइलेक्ट्रिकल व्होटिंग मशिन म्हणजेच ईव्हीएम मशिनवर होणारे मतदान संशयास्पद होत आहे, असे आमचे मत आहे. त्यावर आमचा विश्वास नाही. त्यामुळे आगामी सर्व निवडणुकीत ईव्हीएम नव्हे तर मतपत्रिकेवर ठप्पा मारून (बॅलेट पेपरवर) मतदान घ्यावे, अशी मागणी कोळेवाडी ग्रामस्थांनी केला आहे.
सविस्तर वृत्तजिल्ह्यातील ढगाळ वातावरण हळूहळू निवळू लागल्याने किमान तापमानात उतार येत चालला आहे. गुरूवारी सातारा शहरात १९.५ अंशाची नोंद झाली. त्यामुळे थंडी पुन्हा परतू लागली आहे. तर मागील तीन दिवसांपूर्वी किमान तापमान वाढून २२ अंशावर पोहोचले होते.
सविस्तर वृत्तदेशातील सर्वोत्कृष्ट मॅरेथॉन स्पर्धेपैकी एक म्हणून ओळखली जाणारी वसई विरार महानगरपालिका मॅरेथॉन सातार्याच्या कालिदास हिरवेने जिंकली. 2 तास 18 मिनिटे आणि 19 सेकंदांच्या वेळेसह, सातार्याच्या कालिदास हिरवेचा कोर्स रेकॉर्ड केवळ पाच सेकंदांनी चुकला.
सविस्तर वृत्तकेदारनाथ-बद्रीनाथपासून शिमलापर्यंत उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशच्या शहरांमध्ये मोसमातली पहिली बर्फवृष्टी पहायला मिळत आहे. त्यामुळे या ठिकाणी निसर्गाचे मनमाेहक दृष्य निर्माण झाले आहे.
सविस्तर वृत्तदिनांक 7 डिसेंबर रोजी सातारा जिल्हा क्षयरोग केंद्र सिव्हिल हॉस्पिटल कॅम्पस सातारा येथे 100 दिवसीय क्षयरोग मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले.
सविस्तर वृत्तशिवप्रताप दिन तिथीवर साजरा करणाऱ्या जिल्हा प्रशासनाचा शिवभक्तांनी शिवतीर्थावर रविवारी शिवभक्तांनी आत्मक्लेश आंदोलन केले. या आंदोलनाचे पोस्टर छत्रपती शिवरायांच्या पुतळा परिसरात झळकविण्यात आले.
सविस्तर वृत्तढोल-ताशांचा निरंतर गजर, छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष, रोमांच उभा करणारा तुताऱ्या, झांजांचा आवाज आणि हेलिकॉप्टरमधुन छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्यावर पुष्पवृष्टी, शिवकालीन धाडशी खेळांचे अंगावर शहारे आणणारे प्रात्यक्षिक अशा अलोट उत्साहात आज किल्ले प्रतापगडावर शिवप्रताप दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
सविस्तर वृत्त