जावली तालुक्यातील शेतकर्यांसाठी वरदान ठरलेले महू-हातगेघर 25 वर्षांपूर्वी 90 टक्के पूर्ण झाले होते. मात्र त्यानंतर उरलेले काम सत्ताधार्यांना दिसले नाही का ? विकास म्हणजे ठेकेदारांच्या सोयीची कामे म्हणजे विकास नाही, अशी जळजळीत टीका अमितदादा कदम यांनी महू येथील सभेमध्ये केली.
विनापरवाना फ्लेक्स लावून विद्रूपीकरण केल्याप्रकरणी सातारा तालुका पोलिसांनी एकावर कारवाई केली आहे.
महिलेसह तिच्या दिराला मारहाण केल्याप्रकरणी सहा जणांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राहत्या घरातून युवती बेपत्ता झाल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
अस्तित्व लपवल्याप्रकरणी दोन जणांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी ट्रक चालकाविरुद्ध सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिहे येथे अज्ञात चोरट्यांनी सुमारे दीड लाखांची घरफोडी केल्याची फिर्याद सातारा तालुका पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
सातारा- जावली मतदारसंघात प्रत्येक गावात, वाडी- वस्तीत विकासाचा झंजावात करून शिवेंद्रसिंहराजेंनी संपूर्ण मतदारसंघाचा कायापालट केला आहे. समाजातील सर्व घटकांचे विविध प्रश्न, समस्या सोडवून त्यांनी प्रत्येक घटकाला, प्रत्येक समाजाला न्याय मिळवून देण्याचे काम केले आहे, असे प्रतिपादन सौ. वेदांतिकाराजे भोसले यांनी केले.
नागराज मंजुळेच्या फँड्री या चित्रपटातून लोकप्रिय झालेला सोमनाथ अवघडे (जब्या) आणि राजेश्वरी खरात (शालू) यांच्या लग्नाचा फोटो व्हायरल झाला आहे. मुंडावळ्या बांधलेल्या आणि वधू-वर वेषात दोघे या फोटोमध्ये दिसत आहेत. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
आळंदी-पंढरपूर पालखी महामार्गावर बरड (ता. फलटण) येथील बागेवाडी पेट्रोल पंपाजवळ कंटेनरच्या धडकेत कारमधील तीन जण ठार झाले. सागर रामचंद्र चौरे (वय ३४, रा. पाडेगाव, ता. खंडाळा), भाऊसाहेब आप्पा जमदाडे (वय ४५, रा. खेड बुद्रुक, ता. खंडाळा), नीलेश चंद्रकांत शिर्के (वय ४०, रा. वेटणे, ता. खटाव. मूळ रा. खटाव, ता. खटाव) अशी मृतांची नावे आहेत. काल पहाटे साडेचारच्या सुमारास हा अपघात झाला.