जलसंपदा मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कोयनानगर, ता. पाटण जि. सातारा येथे सातारा सिंचन मंडळ, सातारा जिल्ह्यासाठीची रब्बी हंगाम सन 2024-25 कालवा सल्लागार समितीची बैठक संपन्न झाली.
ना. अजितदादा पवार यांच्यामुळेच सातारा जिल्ह्याचा विकास झाला आहे. त्यामुळे त्यांना मानणारा वर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर आहे.
सज्जनगड येथे सध्या सुरू असलेल्या दास नवमी महोत्सवांतर्गत श्री समर्थ सेवा मंडळाच्या वतीने विविध मान्यवर गायक वादकांचे कार्यक्रम आयोजित केले आहेत.
सातारा जिल्ह्यामध्ये शिवजयंती उत्सवाच्या निमित्ताने संपूर्ण वातावरण भगवेमय झाले आहे. सातारा शहरासह जिल्ह्यात ठिकठिकाणी कमानी झेंडे तसेच वेगवेगळ्या शिव जयंतीच्या कार्यक्रमामुळे जिल्ह्यात शिवभक्तीचा माहोल तयार झाला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचा जाज्वल्य इतिहास, त्यांचे सरदार, शिलेदार यांचा आपल्याला माहित नसलेला इतिहास समाजापुढे आला पाहिजे.
जिल्ह्यातील सर्व नगरपालिका, नगरपंचायतींनी घनकचरा व्यवस्थापन, नाले, गटर स्वच्छता, पथदिवे, शहर सौंदर्यीकरण या बाबींवर भर द्यावा. कोणत्याही स्थितीत शहरे बकाल व घाणेरडी दिसणार नाहीत याची काटेकोर दक्षता घ्यावी, असे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.
सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रयत्नातून एसटी महामंडळाच्या मेढा आगाराला नुकत्याच नवीन ८ एसटी बसेस मिळाल्या.
सज्जनगड येथील श्री समर्थ सेवा मंडळाच्या वतीने सुरू झालेल्या यावर्षीच्या श्री दास नवमी महोत्सव कार्यक्रमांमध्ये मान्यवर महोदयांची प्रवचने तसेच कीर्तने होत आहेत.
सोळशी, ता. कोरेगांव, जि. सातारा येथील सोळा शिवलिंग शनैश्वर देवस्थानचे मठाधिपती प पु नंदगिरी महाराज यांच्यावर सोळशी येथील महिलेने केलेल्या विनयभंगाच्या खटल्यातून नंदगिरी महाराजांची कोरेगांव न्यायालयाने आज निर्दोष मुक्तता केली.
शासनाने शंभर दिवस कृती आराखड्यांतर्गत सात कलमी कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी निर्देश दिले आहेत.