महाराष्ट्राने सलग दुसर्यांदा राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत दोनशे पदके जिंकण्याचा पराक्रम केला आहे. 38 व्या स्पर्धेतही द्विशतकी कामगिरी करणारे महाराष्ट्र देशातील एकमेव राज्य ठरले आहे.
सविस्तर वृत्तराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील माऊंटन बायकिंगमधील एमटीबी सायकलिंग प्रकारात महाराष्ट्राची आंतरराष्ट्रीय सायकलपट्टू प्रणिता सोमण हीने सुवर्णपदकाची भरारी घेतली.
सविस्तर वृत्तमहसूल विभाग हा शासनाचा कणा आहे. हा विभाग आपत्ती पासून ते निवडणुका पार पाडण्याबरोबर शासनाच्या विविध महत्वकांक्षी योजना प्रभावीपणे राबवित असतो.
सविस्तर वृत्तभेदक गोलंदाजी आणि माफक लक्ष्याचा पाठलाग करताना फलंदाजांनी केलेल्या दमदार फलंदाजीच्या जोरावर भारताच्या लेकींनी मलेशियामध्ये झालेल्या १९ वर्षांखालील मुलींच्या टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत दक्षिण आफ्रिकेवर ९ विकेट्सनी मात केली.
सविस्तर वृत्तकाल अहिल्यानगर येथे महाराष्ट्र केसरी २०२५ स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेत शेवटच्या क्षणी मोठा गोंधळ निर्माण झाला. मॅटवरील अंतिम सामन्यात पैलवान शिवराज राक्षे याच्याविरोधात निर्णय दिल्याचा आरोप करण्यात आला. यावरुन पै. शिवराज राक्षे याने मोठा गोंधळ सुरू केला.
सविस्तर वृत्तश्रीलंकेत स्टीव्ह स्मिथचा विक्रम स्टीव्ह स्मिथने इतिहास रचला आहे, तो 10,000 कसोटी धावा करणाऱ्या क्लबमध्ये सामील झाला आहे.
सविस्तर वृत्तछत्रपती शाहू स्टेडियम मधील क्रीडा संकुलामध्ये अनेक क्रीडा प्रकारासाठी संकुले उपलब्ध आहेत. मात्र वारंवार पाठपुरावा करूनही किक बॉक्सिंग या क्रीडा प्रकारासाठी हॉल मिळत नसल्याची तक्रार राष्ट्रीय क्रीडा प्रशिक्षक सागर जगदाळे यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.
सविस्तर वृत्तदेशांतर्गत विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत खेळणारे अनेक स्टार खेळाडू लवकरच इंग्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेत आपली प्रतिभा दाखवताना दिसतील. पण, असा एक खेळाडू आहे ज्याने या स्पर्धेत सलग चार शतकांसह एकूण 5 शतके ठोकली, तरीही त्याला टीम इंडियामध्ये प्रवेश मिळालेला नाही.
सविस्तर वृत्तमेलबर्नच्या मैदानात सुरु असलेल्या बॉक्सिंग डे कसोटी सामन्यातील दुसऱ्या दिवसाच्या खेळातील पहिल्या सत्रात स्टीव्ह स्मिथच्या शतकी खेळीमुळे ऑस्ट्रेलियानं सामन्यावर मजबूत पकड मिळवली आहे.
सविस्तर वृत्तभारतात विजय हजारे ट्रॉफीचा उत्साह कायम आहे. विजय हजारे ट्रॉफीचे सामने चालू आहे आणि याचा आनंद भारतीय क्रिकेट चाहते घेत आहेत. सध्या मुंबई विरुद्ध कर्नाटका यांच्यामध्ये सामना सुरु आहे.
सविस्तर वृत्त