विजयनगर येथे आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह
विजयनगर येथे अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळला असल्याची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
सातारा : विजयनगर येथे अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळला असल्याची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, विजयनगर (जिहे) ता.सातारा गावच्या हद्दीत अंदाजे 45 ते 50 वय असलेल्या पुरुषाचा मृतदेह आढळला. कृष्णा नदी पात्रालगत मृतदेह आढळल्यानंतर सातारा तालुका पोलीस ठाण्यात याची नोंद करण्यात आली आहे.