दुचाकी अपघातातील जखमीचा मृत्यू
दुचाकीच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
सातारा : दुचाकीच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, खावली ता.सातारा गावच्या हद्दीत दुचाकीची धडक बसल्याने गंभीर जखमी झालेले सुभाष शंकरराव जाधव (वय 75, रा. खावली) यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. हा अपघात 6 सप्टेबर रोजी झाला आहे. दरम्यान, दुचाकीस्वार पसार झाला असून अज्ञाताविरुध्द सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.