दमदाटी केल्याप्रकरणी एका विरोधात तक्रार
मोबाईल वरून दमदाटी केल्याप्रकरणी एका विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
सातारा : मोबाईल वरून दमदाटी केल्याप्रकरणी एका विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 21 रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास विजय कृष्णा गाढवे, राहणार कृष्णा नगर सातारा यांना मोबाईल वरून दमदाटी केल्याप्रकरणी त्यांनी सरफराज शेख रा. अपशिंगे, ता. सातारा यांच्या विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक शिरोळे करीत आहेत.