अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी तिघांवर कारवाई
अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी सातारा पोलिसांनी तिघांवर कारवाई केली आहे.
सातारा : अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी सातारा पोलिसांनी तिघांवर कारवाई केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 16 रोजी सातारा शहरातील आकाशवाणी केंद्र ते तामजाई नगर जाणाऱ्या रस्त्यावरील आडोशाला सोमनाथ विठ्ठल मोरे राहणार प्रतापगंज पेठ सातारा हे अवैधरित्या दारू विक्री करताना आढळून आले. त्यांच्याकडून 980 रुपये किंमतीच्या देशी दारूच्या बाटल्या हस्तगत करण्यात आल्या आहेत.
दुसऱ्या घटनेत, गोपाळ वस्ती, अजंठा चौक, सातारा येथे तेथीलच हिराबाई राजाराम निंबाळकर यांच्याकडून सातशे रुपये किंमतीच्या देशी दारूच्या बाटल्या हस्तगत करण्यात आल्या आहेत.
तिसऱ्या घटनेत, लिंब, ता. सातारा येथील माने वस्ती मध्ये असलेल्या एका पत्र्याच्या आडोशाला तेथीलच सुनिता गोपीचंद माने या अवैधरित्या दारू विक्री करताना आढळून आल्या. त्यांच्याकडून 910 रुपये किमतीच्या देशी दारूच्या बाटल्या हस्तगत करण्यात आल्या आहेत.