सासपडे खून प्रकरणातील आरोपीस सात दिवसांची पोलीस कोठडी
सासपडे खून प्रकरणातील आरोपीस सातारा येथील सत्र न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.
सातारा : सासपडे खून प्रकरणातील आरोपीस सातारा येथील सत्र न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. १० रोजी सासपडे, ता. सातारा येथील एका अल्पवयीन मुलीचा खून झाला होता. याप्रकरणी बोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील संशयित आरोपी राहुल बबन यादव राहणार सासपडे तालुका सातारा याला पोलिसांनी शिताफीने अटक केली होती.
या गुन्ह्यामध्ये तथ्य आढळल्याने बोरगाव पोलिसांनी या गुन्ह्यामध्ये पोक्सो कलमाची वाढ केली. आज दिनांक 12 रोजी राहुल यादव याला अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश शेटे यांच्यासमोर हजर करण्यात आले. सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता सुरेखा क्षीरसागर यांनी काम पाहिले. युक्तिवादानंतर न्यायालयाने आरोपी राहुल यादव याला दि. 18 ऑक्टोबरपर्यंत म्हणजेच सात दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.
या गुन्ह्याचा अधिक तपास बोरगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक धोंडीराम वाळवेकर करीत आहेत.