सातारा तालुका पोलिसांचे दोन दारू अड्ड्यांवर छापे
सातारा तालुका पोलिसांनी दि. 22 रोजी दोन अड्ड्यांवर छापे टाकून दोघांवर कारवाई केली आहे.
सातारा : सातारा तालुका पोलिसांनी दि. 22 रोजी दोन अड्ड्यांवर छापे टाकून दोघांवर कारवाई केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 22 रोजी बोरणे, ता. सातारा गावच्या हद्दीतील निसर्ग ढाबा हॉटेलच्या बाजूस अनिकेत संतोष शिंदे रा. मंगळवार पेठ सातारा हा अवैधरित्या दारू विक्री करताना आढळून आला. त्याच्याकडून 910 रुपये किंमतीच्या देशी-विदेशी दारूच्या बाटल्या हस्तगत करण्यात आल्या आहेत.
दुसऱ्या घटनेत, नागेवाडी- लिंब रस्त्याच्या दक्षिण बाजूकडील शेडच्या आडोशास सचिन परशुराम बनसोडे रा. म्हसवे, ता. सातारा हा अवैधरीत्या दारू विक्री करताना आढळून आला. त्याच्याकडून 1050 रुपये किंमतीच्या देशी-विदेशी दारूच्या बाटल्या हस्तगत करण्यात आल्या आहेत.