गळफास घेऊन एकाची आत्महत्या
गळफास घेऊन एकाने आत्महत्या केल्याची नोंद शाहूपुरी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
सातारा : गळफास घेऊन एकाने आत्महत्या केल्याची नोंद शाहूपुरी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शनिवार पेठ, सातारा येथील धनंजय सखाराम संकपाळ (वय 49) यांनी दि. 1 रोजी सकाळी पावणे नऊ वाजता घरातल्या मधल्या खोलीत गळफास लावून घेऊन आत्महत्या केली. याची खबर शाहूपुरी पोलीस ठाण्यात संजय संकपाळ यांनी दिली असून अधिक तपास हवालदार भोसले हे करत आहेत.