अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई
अवैधरित्या दारू विक्री केल्याप्रकरणी एकावर सातारा तालुका पोलिसांनी कारवाई केली आहे.
सातारा : अवैधरित्या दारू विक्री केल्याप्रकरणी एकावर सातारा तालुका पोलिसांनी कारवाई केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 14 रोजी संध्याकाळी सव्वा सहा वाजण्याच्या सुमारास भीमराव प्रल्हाद साबळे रा. साबळेवाडी सातारा हा तेथीलच वेण्णानगर कॉलनीतील बंद घराच्या आडोशाला अवैधरित्या दारू विक्री करताना आढळून आला. त्याच्याकडून 1050 रुपये किंमतीच्या देशी दारूच्या बाटल्या हस्तगत करण्यात आल्या आहेत.